शिवाजीनगर बसस्थानक अत्याधुनिक सेवेसह सज्ज होणार, मेट्रो काम संपण्याची प्रतीक्षा

0
शिवाजीनगर बसस्थानक अत्याधुनिक सेवेसह सज्ज होणार, मेट्रो काम संपण्याची प्रतीक्षा
Share

शिवाजीनगर बसस्थानक अत्याधुनिक सोयी सुविधांसह बांधले जाणार असून पुणे मेट्रो चे काम संपताच MSRTC बस स्थानक विकसित होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली.

शिवाजीनगर बसस्थानक प्रलंबित आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम जुलै २०२२ पर्यंत संपणार असून त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ता परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) त्या ठिकाणी अत्याधुनिक बस स्थानक विकसित करेल. मेट्रो साइटवरील सर्व कामे जमिनीखाली होणार आहेत, तर MSRTC बस स्थानक भुयारी मार्गावरील जागेवर सुसज्ज उभे राहणार आहे.

जुलै २०२२ पर्यंत मेट्रोचे काम पूर्ण होईल, त्यानंतर, भूमिगत काम हाती घेण्याकरिता MSRTC ला जागा ताब्यात देण्यात येईल.

शिवाजीनगर हे पुणे शहरातील सर्वात व्यस्त स्थानक आहे. पुणे मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर बसस्थानक वाकडेवाडी मध्ये स्थलांतर केले गेले आहे. सध्या शिवाजीनगर एसटी स्टँडचे क्षेत्रफळ १५७०० चौरस मीटर आहे. एमएसआरटीसीने मेट्रो रेल्वेच्या कामांसाठी महा-मेट्रोला ३१८५ चौरस मीटर जागा दिली आहे.

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.