पु लं च्या शब्दात…
शून्यातून विश्व का विश्वातून शून्य….!!!!
टू रुम किचन चा एखादा फ्लॅट ,
दोन चार एकर चे फार्म हाऊस,..
एखादी चार चाकी गाडी आणि
भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं ,
की आपण म्हणतो ,
अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं !!
म्हणजे होतंय काय की
सुख मिळेल या आशेने
माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय ,
पण सुखी काही दिसत नाही !!
आपणचं म्हणतो की,
आमच्या लहानपणी खूप मजा यायची…
खूप करमायचं , घर भरलेलं असायचं…
दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही ….!!
मग आता काय झालं ???
मजा कुठ गेली ??
एकटं एकटं का वाटत ??
छातीत धडधड का होते ??
कशामुळे करमत नाही …??
कारण……
“विश्व निर्माण करण्याची ” व्याख्या
कुठेतरी चुकली…… !!
विश्व निर्माण करणं म्हणजे….
नाती गोती जपणं
छंद जोपासणं
पाहुणे होऊन जाणं
पाहुण्यांचे स्वागत करणं
खूप गप्पा मारणं
घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं
खळखळून हसणं
आणि…
काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं !!!
या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर
” शून्यातून विश्व निर्माण केलं ” असं म्हणावं .
तुम्हीच सांगा ,
आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली
की घट झाली …..???
तुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने
किती जणांना सांगू शकता ????
असे किती मित्र , शेजारी , नातेवाईक
आपण निर्माण करू शकलो…????
खूप कमी , किंबहुना नाहीच.. !!!
मग आपण ” विश्व निर्माण ” केलं का ???
तर नाही….
मित्र हो ,
रजिस्ट्री च्या कागदाच्या फायली म्हणजे
विश्व…????
भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व …???
नाही….!
लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे
विश्व…..????
मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व……????
नाही !!
हे समजून घ्यावं लागेल ….!!!
मोठं बनण्याच्या दडपणा मुळे आणि मग कामाच्या व्यापा मुळे
नाती दूर जाणार असतील ,…..
इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि
अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील…
दुःख सांगायला , मन हलकं करायला जागाच
उरणार नसेल….
तर…..
आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं ,
की…
विश्वातून शून्य…. ?????
( पु लं च्या एका संग्रहातून )
आपल्याला पु लं यांचे लेख आवडत असल्यास आम्हाला नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी अजून लेख प्रकाशित करू.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा म्हणजे काय?
महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद
- रोनाल्डो आणि मेसी 3 वर्षानंतर येणार समोरासमोर, गोल्डन तिकीट 22 कोटी रुपयांना विकले : Ronaldo vs Messi
- सुनील शेट्टीचे खंडाळा मधील आलिशान फार्म हाऊस
- Best Pawna Lake Camping For Couples: Top 3 Pawna Camping
Wondering from which book this has been taken? Please reply, want to read that book. Thanks.