भोसरी जमीन खरेदी प्रकरण: पुणे एसीबी ची एकनाथ खडसे यांना क्लीन चीट

0
भोसरी जमीन खरेदी प्रकरण: पुणे एसीबी ची एकनाथ खडसे यांना क्लीन चीट

भोसरी जमीन खरेदी प्रकरण

पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरण एकनाथ खडसे यांना चांगलेच भोवले होते. ४० कोटींची जमीन ४ कोटींमध्ये घेतल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर होता. त्यावरून विरोधकांनी गदारोळ करत एकनाथ खडसे यांना मंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले होते. परंतु एकनाथ खडसे यांनी भोसरी जमीन प्रकरण मध्ये क्लीन चीट देण्यात आलेली आहे. पुणे एसीबीने यासंदर्भात न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे.

खडसेंवरील आरोप सिद्ध होत नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. पुणे एसीबी ने या प्रकरणात शासनाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे. या अहवालामुळे खडसेंवरील आरोप फुसके असल्याचे उघड झाले आहे.
आता यावर विरोधीपक्षाची काय भुमिका आहे हे पाहावे लागेल. या घोटाळ्यामुळे एकनाथ खडसे यांचे भाजपमधील वजन कमी झाले होते तरी आता खडसे दोषमुक्त झाल्यानंतर त्यांना पक्षात पुन्हा एकदा वरचे स्थान मिळते का हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Raghuram Rajan may become Bank of England Governor

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.