पुण्यामध्ये ८ महिन्यात अपघातात २४२ बळी : सर्वाधिक अपघाताचे पुण्यातील ब्लॅक स्पॉट !

0
पुण्यामध्ये ८ महिन्यात अपघातात २४२ बळी : सर्वाधिक अपघाताचे पुण्यातील ब्लॅक स्पॉट !

पुण्यामध्ये गेल्या ७ महिन्यामध्ये तब्बल २४२ जणांना आपला प्राण गमवावा लागला असून पुणे शहर वाहतूक संघटनेने ३६ कायम अपघात होणाऱ्या ठिकाणांची यादी तयार केली आहे . याला ब्लॅक स्पॉट असं नाव दिलाय. यावर उपाय योजना करावी असा प्रस्ताव पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडे पाठवण्यात आला आहे .

पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये अपघातांचे प्रमाण वाढतच आहे . खडी मशीन चौक , उंड्री चौक येरवडा आणि बाणेर रस्त्यावर गंभीर अपघातातात दुचाकीवरील चार महिलांचा नुकताच बळी गेलेला आहे . वाहनांच्या संख्येत होणारी प्रचंड वाढ , अरुंद रस्ते , खड्डे, ड्रंक न ड्राइव्ह, भरधाव वाहन चालवने , स्पीड ब्रेकर वर पट्टे मारलेले नसणे , हेडफोन लावून वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे , मानका पेक्षा उंच गतिरोधक व बेशिस्त वाहनचालक ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत .

तसेच अपघात कमी व्हावेत म्हणून महापालिका , सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलिसांकडून देखील ठोस उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. मात्र आता वाहतूक शाखेने गेल्या २ वर्षातील अपघातांचा अभ्यास करून ब्लॅक स्पॉट फायनल केले आहेत . ही आहे अशाच काही ब्लॅक स्पॉट ची यादी . फक्त ह्या ब्लॅक स्पॉट वरच नव्हे तर सगळीकडे गाडी चालवताना काळजी घेणे आपल्या हातात आहे .

कितीही जाहिराती करून लोक प्रबोधन केले तर जोपर्यंत नागरिक बदलत नाहीत तो पर्यंत काहीच प्रगती होणार नाही . हल्ली बरेच पुणेकर मोबाईल वर बोलत बोलत गाडी चालवणे किंवा कानाला हेडफोन लाऊन गाणी ऐकत ऐकत गाडी चालवणे ही फैशन बनू पाहतेय . मात्र गाणी ऐकत किंवा फोनवर बोलवत गाडी चालवल्यामुळे, मुख्य गाडी चालवण्याकडे दुर्लक्ष होते व पर्यायाने निर्णयक्षमता तसेच बाकी वाहनांचे इशारे , सिग्नल कळत नाहीत व त्यातून अपघात होतो . वाहतूक शाखेने जे ब्लॅक स्पॉट सांगितले आहेत ,ते हे आहेत .

कोथरूड येथील करिष्मा चौक
सहकार नगर येथील वाल्हेकर चौक
कात्रज चौक
दरी पूल
जेधे चौक
डायस प्लॉट
गंगाधाम चौक
फुरसुंगी रेल्वे पुलाजवळ
गाडीतळ परिसर
रामटेकडी चौक
उंड्री चौक
खडी मशीन चौक
विमानतळ भागात तेलाची मोरी
खराडी बायपास
येरवडा येथील हयात हॉटेल समोर
सादल बाबा चौक
संगमवाडी बस पार्किंग
वारजे येथील मुठा नदी पूल
माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ
डुक्करखिंड
वडगाव पूल
नवले पूल
सांगवीतील औंध हॉस्पिटल जवळ
विशालनगर
जगताप डेअरी चौक
बालेवाडी स्टेडियम
वाकड पूल
बावधन पूल
पुनावळे पूल
भूमकर चौक
धावडे वस्ती
नाशिक फाटा
सीएमई बोपोडी
भक्ती शक्ती चौक
दिघी मॅगझीन चौक
एआयटी कॉलेज
? ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा ..लाईक करा ?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.