संचारबंदी चे नवीन आदेश: पुणे जिल्ह्यामध्ये अचानक वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे शहरात संचारबंदी चे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांनी संचारबंदी चे नवीन आदेश काढले आहेत.
खडक, फरासखाना, स्वारगेट आणि कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या संचारबंदी चे नव्याने नियम लागू करण्यात आले आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि सेवा जसेकी भाजीपाला, दूध पदार्थ, किराणा याची विक्री सकाळी १० ते १२ या वेळेतच करण्यास परवानगी आहे. मेडिकल यासारख्या सुविधा सुरु राहणार आहेत.
संचारबंदी चे नवीन आदेश परिपत्रक



नागरिकांना सरकारला मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने हे निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी घरीच राहून पोलिसांना सहकार्य करावे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.