कोरोना रोग पार्श्वभूमीवर सोसायट्यांनी स्वतःचे नियम लादणे बेकायदेशीर- जिल्हाधिकारी

0
कोरोना रोग पार्श्वभूमीवर सोसायट्यांनी स्वतःचे नियम लादणे बेकायदेशीर- जिल्हाधिकारी

कोरोना रोग च्या धर्तीवर पुण्यातील अनेक सोसायटी आपापले नियम लावून सोसायटी लोकांना वेठीस धरत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था (हौसिंग सोसायटी) आणि इतर गृहनिर्माण संस्थांनी स्वतःची बंधने न लादता शासनाच्या, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आदेश दिले आहेत.

कोरोना रोग सुरू झाल्यापासून जिल्हा प्रशासन वेळोवेळी आदेश पारित करत असून त्यानुसार ते सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. आदेशाचे पालन करताना टाळाटाळ केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत

गृहनिर्माण संस्था (हौसिंग सोसायटी) यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्क लावणे, निरजूंकीकरण करणे, सॅनिटायजर वापर करणे, साबणाने हात धुणे, जेष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर स्त्रिया यांची काळजी घेणे, सामाजिक अंतर राखणे, अनावश्यक गर्दी टाळणे, आशा बाबींवर जनजागृती करून सोसायटीमध्ये उपाययोजना कराव्यात असे जिल्हाधिकारी म्हणाले.

सोसायटीमधील कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत आल्यानंतर त्यांच्यावर, त्यांच्या नातेवाईक, केअर टेकर यांच्यावर बहिष्कार टाकू नये, सोसायट्यामधील  अत्यावश्यक सेवेतील अधिकारी – कर्मचारी यांना योग्य पद्धतीने वागणूक देण्यात यावी, त्यांना कर्तव्यावर येणे – जाणे करिता प्रतिबंध करू नये. नाहीतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती, संस्था, प्लंम्बर, इलेक्ट्रिशियन, गॅस आणि पाणी पुरवठा करणाऱ्या व्यक्तीना येण्याजाण्यास सोसायटी ने प्रतिबंध करू नये.
गृहनिर्माण संस्था (हौसिंग सोसायटी) यांनी स्वतःचे काहीही नियम लादू नयेत.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.