पुणे प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) घोषित करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र आणि त्याबाहेरील क्षेत्र घोषित केले आहेत. नवीन नियमानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नियम शिथिल करण्यात आले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील अनेक भागात कोरोना विषाणूमुळे संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन)
पुणे महापालिका क्षेत्रातील 15 वॉर्ड पैकी 12 वॉर्ड हे रविवारी रात्री 12 वाजेपासून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्र मध्ये नेहमीप्रमाणे जीवनावश्यक सेवा/वस्तू पुरवठा सुरू राहणार असून बाकी नियम नेहमीप्रमाणे ठेवण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तू सेवा/पुरवठा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 15 पैकी 3 क्षेत्र मध्ये नियम शिथिल होणार आहेत. नेहमीप्रमाणे अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या वाहतुकीसाठी पोलीस पास घेण्याची गरज नाही.
पुणे प्रतिबंधित क्षेत्र यादी
- कसबा – विश्रामबागवाडा
- ढोलेपाटील रोड
- कोंढवा येवलेवाडी
- भवानी पेठ
- नगर रोड – वडगाव शेरी
- येरवडा, कळस, धानोरी
- धनकवडी – सहकारनगर
- शिवाजीनगर – घोले रोड
- हडपसर – मुंढवा
- वानवडी, रामटेकडी
- कोथरूड – बावधन
- बिबवेवाडी
पुणे प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भाग
- सिंहगड रस्ता
- औंध, बाणेर
- वारजे, कर्वेनगर
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भागातील नियम
- अत्यावश्यक सेवा सकाळी 10 ते सायंकाळी 6 सुरू राहतील
- ई-कॉमर्सद्वारे अत्यावश्यक वस्तुंना परवानगी
- रहिवासी कॉलनी/रहिवासी संकुल मधील दुकाने उघडी राहू शकतात
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा देणाऱ्या एका रस्त्यावरील फक्त 5 दुकानांना सुरू राहण्याची परवानगी
- नियमांसह मद्यविक्री सुरू
- मजूर जागेवर उपलब्ध असल्यास बांधकाम व्यवसायाला परवानगी
- केवळ अनुज्ञेय कामासाठी वैयक्तिक वाहन वापरता येणार
- दुचाकीवर फक्त एक तर चारचाकी मध्ये चालकाशिवाय दोघांना परवानगी
- मेट्रो काम, पावसा आधीची कामे, धोकादायक इमारती कारवाई परवानगी घेऊन सुरू होणार
प्रतिबंधित क्षेत्रात विनाकारण फिरणाऱ्यावरनेहमीप्रमाणे कारवाई सुरू राहणार आहे. फक्त अत्यावश्यक वस्तूंसाठी दिलेल्या वेळेत आपण बाहेर पडू शकता.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
स न 12 सुखसागर नगर भाग एक कात्रज (जडाबाई दुगड शाळा ते राजस सोसायटी ) या परिसरातील परवानगी मिळालेल्या बांधकामासाठी व सध्या थांबलेल्या घर बांधनीसाठी परवानगी मिळणार का ? डाॅ शिरीष शेपाळदेशमुख cardiologist and scientist 9422301100
कात्रज भाग प्रतिबंधित क्षेत्र मध्ये येत असल्याने परवानगी मिळणे अशक्य आहे.