वाहनचालक पोलीसाला बोनेटवर घेऊन निघाला; पुण्यातील थरार CCTVत कैद !

0
वाहनचालक पोलीसाला बोनेटवर घेऊन निघाला; पुण्यातील थरार CCTVत कैद !
Share

पुणे | पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिक पोलिसासोबत एक घटना घडली आणि शहरभर थरकाप उडाला. बऱ्याचदा छोट्या मोठ्या घटना घडत असतात पण हा थरकाप उडवणारा व्हिडीओ वायरल होत आहे. पोलिसांशी हुज्जत घालणारे अनेक बेजबाबदार नागरिकांच्या घटना घडताना आपण पहिल्या आहेत. त्यामध्ये आता या थरारक घटनेची भर पडली आहे.

ट्रॅफिक पोलिसाने रोखलं म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये एका चालकाने पोलिसाला थेट बोनेटवर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास केलाय. हा घटनेचा थरार मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्हीत कैद झाला असून सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र इतरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या पोलिसाचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.

गुरुवारी युवराज हणवते तोंडाला लावण्याचा मास्क गळ्याभोवती ठेवत गाडीतून निघाले. वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत यांच्या ते निदर्शनास आल्याने कारवाईसाठी हात दाखवत गाडी थांबवली. गाडी थोडी थांबवताच हणवतेंनी गाडी पुन्हा सुरु केली.

यावेळी सावंत यांचा बोनेटच्या दिशेने तोल गेला. सावंत बोनेट वरून खाली उतरणार तेव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवला. दरम्यान दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांनी गाडीला घेरत गाडी थांबवली. गाडी थांबताच सावंत बोनेटवरून कसेबसे उतरले. त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ:

पुण्यातील या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जातो आहे. कायदा सुव्यवस्था पाळणे हे सामन्यांचे कर्तव्य आहे.

दोन दिवसांपूर्वीच शिवार गार्डन पाशी तरुणांनी पोलिसांची कॉलर पकडली होती. आणि आता या प्रकारानंतर पोलिसांना संरक्षण हवे आहे का असे प्रश्न पडत आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.