Pune: पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणे Unlock 1.0 नियमानुसार एक एक करत सुरू होत आहेत. गुरुवारी पुण्यातील जवळपास 31 उद्याने सुरू करण्यात आली आहेत. या उद्यानात काही नियमांसह प्रवेश दिला जाणार आहे. उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 8 तर सायंकाळी 5 ते 7 असणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणे पैकी एक महात्मा फुले मंडई, तुळशीबाग मार्केट, लोकप्रिय शॉपिंग स्पॉट हॉंगकॉंग लेन सुद्धा आजपासून सुरू झाले आहे
पुणे उद्यान प्रवेश नियम
- नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. पालिकेने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत.
- 10 वर्षाखालील मुले, गरोदर महिला, 65 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध व्यक्ती, मधुमेह आणि हृदयरोग यांसारखे आजार असलेले व्यक्ती, आजारी व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही
- पान, तंबाखु, गुटखा खाणे आणि थुंकणे दंडात्मक कारवाईस पात्र असं
- उद्याने फक्त जॉगिंग साठी खुली, बाकीचे सामुदायिक कार्यक्रम करता येणार नाहीत
- नागरिकांनी उद्यानांमध्ये सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून वैयक्तिक व्यायाम करणे बंधनकारक आहे.
- जिम साहित्य, खेळणी, हिरवे गवत, बेंच या वस्तूंचा/सुविधांचा वापरावर बंदी आहे
- पालिकेने लागू केलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक अटी पाळणे अनिवार्य आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, टि्वटर आणि इंस्टाग्राम, टेलिग्राम वर भेट द्या.