पुण्यातील गडकिल्ले पर्यटकांसाठी खुले, हे आहेत नियम

0
पुण्यातील गडकिल्ले पर्यटकांसाठी खुले, हे आहेत नियम
Share

कोरोनामुळे बंद असलेले पुण्यातील गडकिल्ले आजपासून खुले करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील गड किल्ले आजपासून पर्यटक तसेच गिर्यारोहक यांच्यासाठी खुले झाले आहेत.

पुण्यातील गडकिल्ले पर्यटकांसाठी खुले, Pune trekking rules

जिल्हाधिकाऱ्यांनी गड-किल्ले सह डोंगरकड्यांवर भटकंतीस तसेच ट्रेकिंगसाठी परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करून आपण गडकिल्ल्यास भेट देऊ शकता.

मार्च पासून कोरोना लॉकडाउन मुळे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर प्रवेश बंदी होती. हळूहळू अनलॉक अंतर्गत लॉकडाऊन नियम शिथिल करण्यात येत आहेत. पुण्यातील सर्व बाजारपेठा, मैदाने, उद्याने तसेच बागा एक एक करून सर्व उघडल्या जात आहेत. गडप्रेमी आणि पर्यटकांकडून गडकिल्ले पर्यटनासाठी खुले करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत हाती. नुकतीच ही मागणी जिल्हा प्रशासनाने मान्य केली आहे.

पुण्यातील गडकिल्ले यांना भेट देण्यासाठीचे नियम

  • ट्रेकिंगसाठी एका ग्रुप मध्ये पंधरा पेक्षा जास्त सदस्य नसावेत, प्रत्येकाचे तापमान तपासण्याचे बंधन
  • ट्रेकिंग साठी जास्त सदस्य असल्यास वेगवेगळे ग्रुप बनवून वेळेत फरक ठेवणे बंधनकारक
  • मास्क चा वापर बंधनकारक
  • 10 वर्षांच्या आतील तसेच 65 वर्षांच्या वरील व्यक्तींना परवानगी नाही
  • सोशल डिस्टनसिंग पाळणे आवश्यक

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.