अटी आणि शर्तीसह पुण्यातील उद्याने पुन्हा खुली होणार

0
अटी आणि शर्तीसह पुण्यातील उद्याने पुन्हा खुली होणार

पुण्यातील उद्याने खुली करण्याच्या अटी काय आहेत ?

पुणे : पुणे ( Pune ) महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने केव्हा खुली होणार याकडे अनेक लोकांचे लक्ष होते. लोकांना चालणे, धावणे यासाठी उद्यानात जावे लागते. अनेक नागरिकांना सकाळचे चालण्याची सवय आहे. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई होती. आता Unlock 1.0 मध्ये पुण्यातील उद्याने खुली करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पुणे शहरातील 199 पैकी 150 उद्याने उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहेत. परंतु अटी लावून ही उद्याने चालू करण्यात येत आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागातील ही उद्याने आहेत. यामध्ये फक्त वैयक्तिक कवायती अथवा व्यायाम करता येतील. गर्दी करता येणार नाही. २ गज अंतर असणे गरजेचे आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे. सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. पुणे शहरातील मैदाने किंवा उद्याने सुरु होणार असली तरी रेस्टॉरंट, धार्मिकस्थळे, मॉल, मल्टिप्लेक्स पुढील काही दिवस बंद राहणार आहेत. अनेक गोष्टीना टप्प्याटप्प्याने सूट देण्याची योजना पालिकेची आहे.

पुणे शहरातील नागरिकांनी सुजाण नागरिकांना पालिकेने नियम व अटीचे पालन करत बाहेर पडण्याची मुभा दिली आहे. शहरात कोरोना वर मात करण्यासाठी यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यामध्ये नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.