पुण्यात घरच्या घरी विलगीकरण करण्यास मान्यतेबाबत मोठा निर्णय

0
पुण्यात घरच्या घरी विलगीकरण करण्यास मान्यतेबाबत मोठा निर्णय

पुणे शहरात 10 हजार बेडची सुविधा असताना घरी विलगीकरण बाबत पालिका आयुक्‍तांचा नवीन निर्णय आला आहे.

पुणे – कोरोना बाधित असलेल्या मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना हमीपत्र घेऊन त्यांच्या घरीच विलगीकरण करण्यास महाराष्ट्र राज्यशासनाने मुभा दिली आहे. मात्र, पुण्यात बाधितांवर उपचारासाठी 10 हजार खाटांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पुण्यात करोना बाधितांवर रुग्णालयातच उपचार केले जातील, असे महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी म्हटले आहे.

केंद्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, लक्षणे नसलेले, अतिसौम्य लक्षणे असलेले, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणे अशा स्वरूपात बाधितांचे वर्गीकरण करायचे असून, त्यांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ज्यांना लक्षणे नाहीत, अशांना घरीच विलगीकरणात ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने तूर्तास या आदेशाची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्‍तांनी सांगितले.

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 8 हजारांच्या आसपास असली, तरी प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या 2484 आहे. तर, महापालिकेने आधीच 10 हजार बेड्‌सची तयारी केली असून डॉक्‍टर्ससह सुविधाही तयार आहेत. पुण्यात सर्वाधिक रुग्ण झोपडपट्टी भागातील आहेत. त्यामुळे लक्षणे नसली, तरी त्यांना घरी सोडणे योग्य होणार नाही. जर लक्षणे नसली तरी रुग्णाकडून इतरांना बाधा झाल्यास आजाराचा प्रसार वाढणार आहे. त्यामुळे पुण्यात संस्थात्मक विलगीकरण अथवा हॉस्पिटलमध्येच उपचार केले जातील.
– शेखर गायकवाड, आयुक्‍त, पुणे मनपा

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.