पुणे कोरोना: घरातील विलगिकरणातुन काहीजण फरार, पोलिसांचे कारवाईचे संकेत

0
पुणे कोरोना: घरातील विलगिकरणातुन काहीजण फरार, पोलिसांचे कारवाईचे संकेत

पुणे कोरोना; २२ मार्च, २०२०: आज पुणे शहर पोलिसांकडून घरातच विलगिकरण मध्ये असलेल्यांची तपासणी करण्यात आली. परदेशातून परत आलेल्या आणि विलगिकरण मध्ये असलेल्या सर्वांची चौकशी करण्यात आली.

पोलिस आयुक्त डॉ. के वेंकटेशम म्हणाले, “१३६ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पुष्कळ लोक घरी होते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करीत असल्याचे पथकाला आढळले. परंतु पुणे पोलीस पथकाला काहीजण आपापल्या घरी आढळले नाहीत. कदाचित ते आपापल्या गावी गेले आहेत किंवा राज्य किंवा देशाच्या अंतर्गत गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नाहीये.

Home quarantine patient stamp
Home quarantine patient stamp

या सर्व लोकांना पोलिसांनी फोनवरून किंवा पुणे कोरोना हेल्पलाईन 1800 233 4130 वर संपर्क साधून त्यांच्या निवासस्थानाविषयी व त्यांच्या घरातील उपाययोजनांबद्दल तपशीलवार माहिती देण्यास सांगितले आहे. परदेशातुन आलेल्या सर्वांनी संपर्क साधून आपण राहत असलेल्या ठिकाणची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे हे लोक स्वत: ला आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यास मदत करतील.

पुण्याचे लोकांना विलगिकरण मधील कोणी व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास पोलिसांना माहिती देऊ शकता. विलगिकरण मधून बाहेर पडलेल्या व्यक्तींनी आपली माहिती पोलिसांना न दिल्यास पोलिस दंडात्मक कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत असे पोलिस आयुक्त डॉ. के वेंकटेशम म्हणाले

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.