Pune: वाढदिवसाला धिंगाणा घालणे पडले महागात! बर्थडे बॉय वर अंडे फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
Pune: वाढदिवसाला धिंगाणा घालणे पडले महागात! बर्थडे बॉय वर अंडे फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल
Share

Pune: पुणे जिल्ह्यात तरुणांना रस्त्यावर धिंगाणा घालणे चांगलेच महागात पडले आहे. बर्थडे बॉय च्या अंगावर अंड्यांचा वर्षाव केल्यामुळे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अंडे मारण्याचा व्हिडिओ पुण्यात सर्वत्र व्हायरल होत असून नारायणगाव येथे मुक्ताई मंदिरासमोर वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या आणि बर्थडे बॉय वर अंडी फेकून मारणाऱ्या एकूण ६ जणांवर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहेत.

काय घडले होते?

सकलेन नासिर शेख या तरुणाचा नुकताच १८ वा वाढदिवस त्याच्या मित्रांनी साजरा केला. मुक्ताई मंदिराच्या पुढे सकलेन शेख च्या मित्रांनी एकमेकांवर अंडी फेकत धिंगाणा घालायला सुरुवात केली. व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे सर्व दिसत आहे.

यामध्ये सकलेन, साकीर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन अकलाक आत्तार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहिद पिरमहम्मद पटेल. सर्व (रा. मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यात धिंगाणा घालत वाढदिवस साजरा करण्याची एक नवी प्रथा उगम घेत असून असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. चक्क तलवारीनं केक कापून एका पैलवानानं आपला वाढदिवस साजरा केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नारायणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तरुणांच्यात धिंगाणा घालत वाढदिवस साजरा करण्याची नवीन पद्धत गुंडागर्दी, दहशत निर्माण करणे याकडे जाऊ नये याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला हवे.

आपल्याला याबद्दल काय वाटते?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.