Pune Lockdown 2: उद्यापासून फेस 2 ला सुरुवात, काय काय सुरू राहणार?

0
Pune Lockdown 2: उद्यापासून फेस 2 ला सुरुवात, काय काय सुरू राहणार?
Spread the love

Pune Lockdown 2: पुणे मध्ये मागील पाच दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे. आता या लॉकडाउन मधून लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रविवारी दिवसभर मुभा देण्यात येणार आहे. किराणा, भाजीपाला, मटन, चिकन, अंडी, मासे यांच्या विक्रीची दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सोमवारी आषाढ अमावस्या असून मंगळवार पासून श्रावण महिना सुरू होत आहे त्यामुळे रविवारी मांसाहार खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे, अचानक होणारी गर्दी टाळण्यासाठी दिवसभर खरेदी करण्यासाठी ही मुभा देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्तांनी याबाबत वेगळे आदेश काढले आहेत.

Pune Lockdown 2 रविवारपासून सुरू होत असून गेल्या पाच दिवसांपासून ही सर्वकाही बंद आहे. पुढील कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्यासाठी रविवारी मुभा देण्यात आली आहे. कमी वेळ दिल्यास झुंबड उडण्याची शक्यता नाकारण्यात येत नसून जास्त वेळ देण्यात आला आहे. आपापल्या वेळेनुसार लोकांनी वस्तू खरेदी कराव्यात.

विक्रेत्यांनी सुरक्षित अंतर ठेवून नागरिकांना साहित्य विक्री करण्यास पालिकेने सांगितले असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पालिका आयुक्त कुमार यांच्याकडून देण्यात आला आहे.

सोमवार पासून म्हणजेच 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यात सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोस विक्रेते, सर्व व्यवसाय करणारी व्यापारी दुकाने, मंडई, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाले यांना या वेळेतच विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्तांनी याबाबत आदेश प्रसिद्ध केले आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.