Pune Lockdown Rules: काय सुरू आणि काय बंद राहणार?

0
Pune Lockdown Rules: काय सुरू आणि काय बंद राहणार?
Share

Pune Lockdown Rules Latest: राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात दिलेल्या पाच स्तरीय नियमावलीनुसार पुणे पालिकेने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून नवीन नियम लागू होणार आहेत. याबाबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महापालिका नवी नियमावली जाहीर केली आहे.

Latest Pune Lockdown Rules

खालील नमूद आस्थापना/ उपक्रम सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील

 • पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी दि. 05.06.2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.
 • अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त (Non-Essential Shop) इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
 • अभ्यासिका, ग्रंथालय आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील. सार्वजनिक वाचनालय सुरु राहतील.
 • कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था (Training Institute) हॉलच्या आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील.
 • मॉल 50% क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र सिनेमागृह ( Single Screen and Multiplex ) नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.
 • व्यायामशाळा (Gym), सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (By Appointment) आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. मात्र सदर ठिकाणी वातानुकूल (A.C.) सुविधा वापरता येणार नाही.
 • कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे सुरु राहतील.
 • मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.
 • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील. पार्सल सेवा / घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहील.
 • लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.
 • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते 9 व दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड-19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये 100% क्षमतेने सुरु राहतील.
 • शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त ) 50% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी थांची परवानगी घ्यावी.
 • सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी 50% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील.
 • सर्व मैदानी खेळ (आउटडोअर स्पोर्ट्स) हे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. तसेच इनडोअर स्पोटर्स सकाळी 5 ते 9 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत सुरु राहतील.
 • सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास 50 लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी राहील.
 • लग्न समारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
 • अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
 • विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा या 50% उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.
 • पुणे महानगरपलिका क्षेत्रामधील बांधकामे नियमितपणे सुरु राहतील.
 • ई – कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
 • पुणे महानगरपालिका क्षेत्रात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी ) प्रतिबंध राहील. तसेच रात्री 10 नंतर अत्यावश्यक कारण ( Valid Reason) वगळता संचारबंदी लागू राहील.
 • पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजिक वाहतूक व्यवस्था (PMPML) आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने ( without standing ) सुरु राहील.
 • माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना व त्यामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्ती ( चालक + क्लीनर /मदतनीस ) यांना इतर प्रवाश्यांना लागू असलेल्या नियमानुसार प्रवास करणेस परवानगी राहील.
 • खाजगी वाहनातून, बसेस तसेच लाब अंतराच्या रेल्वे मधून आंतर जिल्हा प्रवास करण्यास परवानगी राहील. मात्र सदर वाहने शासनाने घोषित केलेल्या लेवल 5 मधील ठिकाणी थांबणार असतील तर e-pass असणे बंधनकारक राहील. अशावेळी वाहनामधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र e-pass आवश्यक राहील.
 • 1Export oriented units ( including MSMEs that need to fulfill export obligation) मधील उत्पादन नियमितपणे सुरु राहील.

खालील उत्पादन क्षेत्र / उद्योग नियमितपणे सुरु राहतील.

अ) अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग (Essential goods manufacturing units) – (अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल उत्पादन करणारे युनिट, त्याची पॅकेजिंग करणारे युनिट आणि संपूर्ण पुरवठा साखळी यासह ).

ब) सतत प्रक्रिया करणारे उद्योग (All continuous process industries) – (Units that require process that are of such a nature that these cannot be stopped immediately and can not restart without considerable time requirement).

क) राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाशी संबंधित उत्पादन करणारे उद्योग. ( Manufacturing of items that are significant to National Security and Defence)

ड) Data Centers / Cloud Service providers / IT Services supporting critical infrastructure and services.

 • उपरोक्त मुद्दा क्र 18 व 19 येथे नमूद केलेल्या उद्योगांव्यतिरिक्त इतर सर्व उत्पादन क्षेत्र हे 50% कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. कर्मचारी ने-आण कण्यासाठी संबंधित उद्योगांनी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करावी. सदर कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येणार नाही.
 • सदर आदेश हे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहतील.
 • संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
 • सदरचे आदेश हे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९ सरासरी पॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड ऑक्यूपन्सी यांचे टक्केवारीनुसार शासनाने निश्चित केलेल्या लेवल विचारात घेऊन केलेले आहेत. जर त्यामध्ये वाढ / कमी झाल्याचे आढळून आल्यास याबाबत आढावा घेऊन सुधारित आदेश निर्गमित केले जातील.

सदर Pune Lockdown Rules आदेश दि.14 जून 2021 पासून पुढील आदेशापर्यंत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE Funny Memes:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.