पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून त्यांची तब्बेत ठीक असल्याचे ते म्हणाले आहेत.
थोडासा ताप आल्याने त्यांनी तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ रोज पालिकेची कामे, कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी रोज बैठका घेत होते. अनेक भागांना भेट देऊन तेथील सोयीसुविधा पाहत होते. यामुळे त्यांना कोरोना बाधा झाल्याची शक्यता आहे. पुण्यातील अजून एका नेत्याला कोरोना लागण झाली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ झाली आहे.
शनिवारी सकाळी पिंपरी चिंचवड नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ आमदार महेश लांडगे यांना सुद्धा कोरोना लागण झालेली आहे.
त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. रोज ते पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. पुण्यातील लोकांना संपूर्ण माहिती मिळेल याची काळजी घेत होते.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, टि्वटर आणि इंस्टाग्राम, टेलिग्राम वर भेट द्या.
अजुन वाचण्यासाठी:
- पिंपरी चिंचवड: आजचे प्रतिबंधित क्षेत्र, कोरोना बाधित संख्या, वॉर्डनिहाय कोरोना केस.
- Containment Zone in Pune, Pune Area Wise Corona Cases