पुणे कोरोना निर्बंध: गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका, पुणे महापौर आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर आदेश पालिका लवकरच जारी करणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पुणे कोरोना निर्बंध कडक होणार!
विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ २०० जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
हॉटेल/रेस्टॉरंट/बार सुरू ठेवण्यास रात्री ११ पर्यंतच मुभा !
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री ११ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. याबाबतचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. .
नियमांचे पालन करुन अभ्यासिका सुरु राहणार !
शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अभ्यासिका सुरुच ठेवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी करुन ही परवानगी देण्यात येत आहे.
रात्री ११ नंतर अनावश्यक फिरणे टाळा !
शहरात रात्री ११ वाजल्यानंतर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून आपणही रात्री ११ नंतर घराबाहेर पडणे टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकेल.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- शिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय? शिवगर्जना
- डॉ. शीतल आमटे यांच्याविषयी माहिती, कोण होत्या शीतल आमटे