आतापर्यंत आपल्याला गाडीत भरण्यासाठी पेट्रोल भरण्यासाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते मात्र आता पुण्यात ‘सेल्फ-फ्यूलिंग’ (आत्मनिर्भर) पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे. आपण या पेट्रोल पंपावर गेल्यास आपण स्वत: आपल्याला हवे तेवढे पेट्रोल भरू शकता. कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरटीओ चौक स्थित पेट्रोल पंपावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने ग्राहकाला आधी पेट्रोल पंपावर सॅनिटायझर दिला जातो नंतर कर्मचाऱ्यांकडून पेट्रोल कसे भरायचे याबद्दल सूचना दिल्या जात आहेत. पेट्रोल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ग्राहकाला करावी लागत आहे. महाराष्ट्रात स्वावलंबी पेट्रोल पंप (आत्मनिर्भर पंप) सुरू करण्याचा हा पहिला प्रयोग आहे.

ग्राहकांकडून अनेकवेळा कर्मचाऱ्यांकडून पेट्रोल भरताना फसवणूक केल्याच्या तक्रारी येत असतात. आकडेवारीत घोळ करून किंवा भरताना हातचलाखी करून अनेकवेळा ग्राहकांना फसवल्याचे प्रकार घडत असतात. या प्रयोगामुळे लोकांना फसवणूक न होता आपल्या हाताने पेट्रोल भरता येईल.
पाश्चात्य देशात पेट्रोल डिझेल अशाच प्रकारे भरले जाते. स्वतःहून पेट्रोल भरण्याची ही भारतातील अनोखा प्रयोग पुण्यात होत असून याला कितपत यश मिळेल हे पाहावे लागेल.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, टि्वटर आणि इंस्टाग्राम, टेलिग्राम वर भेट द्या.