पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी, कोंढव्यात 84 हजाराचा मुद्देमाल जप्त

0
पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी, कोंढव्यात 84 हजाराचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील कोंढवा परिसरात सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. हुक्का विक्रीसाठी आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आलं (Pune Hukka Home Delivery)

कोंढवा : पुण्यात चक्क हुक्क्याची होम डिलिव्हरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडलं. त्यामुळे आधी गांजा, नंतर गुटख्याची लपून तस्करी सुरु असताना आता हुक्क्याच्या विक्रीचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन मद्यविक्री सुरु झाली असतानाच हुक्काप्रेमींनाही तलफ अनावर झाली आहे. (Pune Hukka Home Delivery)

‘व्हॉट्स हॉट’ या संकेतस्थळावर मोबाईल संपर्क देऊन हुक्क्याची जाहिरात करण्यात आल्याची माहिती आहे. संकेतस्थळावर संपर्क करणाऱ्या व्यक्तीला हुक्क्याची घरपोच डिलिव्हरी केली जात होती. लोकांना जीवनावश्यक वस्तू भेटताना अडचणींचा सामोरा करावा लागत आहे आणि काही महाभाग हुक्का विक्री करून पैसे कमविण्यात व्यस्थ आहेत.

पुण्यातील कोंढवा परिसरात तालाब चौक भागात सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आलं. मित विजय ओसवाल, रॉयल जयराम मधुरम आणि परमेश महेश ठक्कर अशी आरोपींची नावं आहेत.

तिन्ही आरोपी 19 ते 28 वर्ष वयोगटातील आहेत. तिघांकडून 6 हुक्का पॉट, सहा पाकीट तंबाखूजन्य फ्लेवर, चार मोबाईल फोन, दोन मोपेड गाड्यांसह 84 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान हुक्का डिलीव्हरीची अनेक संकेतस्थळ उपलब्ध असल्याचं समोर आलं आहे. या संकेतस्थळांवर विक्रेत्याचे मोबाईल नंबर देण्यात येतात. त्याचबरोबर हजारापासून पुढे ग्राहकानुसार जास्त पैसे घेऊन हुक्का घरपोच डिलिव्हरी केला जातो.

हुक्का विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहेच परंतु जर कोणी ते घेण्याचा प्रयत्न करत असेल त्यानाही अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच अनेक जण मोबाईल क्रमांक गोळा करून फसवणूक सुद्धा करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून शासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.