पुणे पालिकेने पुण्यात कोरोना बाधित संख्या वाढत जाऊन जून अखेर 22-23 हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याबाबत पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती सुद्धा पालिकेने दिली आहे.
आयसोलेशन बेड, ऑक्सिजन सह आयसोलेशन बेड, ICU बेड, व्हेंटिलेटर यांची पूर्तता पालिका करत असून याबाबतची उपाययोजना आणि सध्याच्या परिस्थितिची माहिती प्रकाशित केली आहे.

पालिकेने वर्तवलेल्या अंदाजानुसार 3 जून पर्यंत एकूण 6936, 17 जून पर्यंत एकूण 12896, 30 जून पर्यंत एकूण 22940 जणांना कोरोना बाधा होण्याची शक्यता आहे. 30 जून पर्यंत 9743 जणांवर उपचार सुरू असतील आणि त्यासाठी ICU बेड आणि व्हेंटिलेटर ची कमतरता होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे कोरोना परिस्थिती: कोरोना बाधित
पुण्यात आतापर्यंत 5533 जणांना कोरोना झाला आहे. 2190 जणांवर उपचार सुरू आहेत. 3059 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 284 जणांचा मृत्यू झाला आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.