पुणे: रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू, कोविड निदान आता 30 मिनिटांमध्ये

0
पुणे: रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू, कोविड निदान आता 30 मिनिटांमध्ये
Spread the love

पुणे महानगरपालिका (PMC) ने रॅपिड अँटीजेन टेस्ट करायला पाच प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली आहे, अशी माहिती पीएमसीच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

रॅपिड अँटीजेन किट ने कोरोना चाचणी करताना
रॅपिड अँटीजेन किट ने कोरोना चाचणी करताना

ही चाचणी 30 मिनिटांत Covid-19 चा अहवाल देते. काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेने तब्बल एक लाख रॅपिड अँटीजेन चाचणी किट खरेदी केल्या असून यामुळे Covid-19 अहवाल लवकरात लवकर मिळणे शक्य होणार आहे.

सोमवारी केलेल्या 264 चाचण्यांपैकी 27 जण Covid-19 सकारात्मक आढळले असून तर उर्वरित Covid-19 नकारात्मक आहेत. सध्या या चाचण्या फक्त उच्च जोखमीच्या जवळच्या संपर्कात आलेल्या लक्षणे नसलेल्यांवर केल्या जात आहेत. ज्यांना कोरोना लक्षणे आहेत त्यांची चाचणी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन (RT-PCR) पद्धतीने घेतली जात आहे.

रॅपिड अँटीजेन किट ने कोरोना चाचणी करताना
रॅपिड अँटीजेन किट ने कोरोना चाचणी करताना

Covid-19 साठी पुण्यात रोज 5000 चाचण्या केल्या जाणार असून सध्या 4000 च्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत पीएमसी अंतर्गत 1.37 लाखाहून अधिक लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. पुण्यातील मृत्युदर देखील कमी आला असून आता तो 3.23 टक्क्यांवर आला आहे.

पुणे मृत्युदर

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.