कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पुण्यातील बाजारपेठ शासनाचा आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरुवारी घाऊक आणि किरकोळ यांची पुणे व्यापारी महासंघाची बैठक झाली. यात शासनाचे आदेश येईपर्यंत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

गुरुवारी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि व्यापारी महासंघ पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. व्यापारी महासंघाच्या या निर्णयामुळे शहरातील हजारो दुकाने बंद राहणार आहेत. व्यापारी महासंघाने यापूर्वी तीन दिवस दुकाने बंद ठेवली होती. आता शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा सर्वांच्या सहमतीने निर्णय झाला. या बंद मधून जीवनावश्यक वस्तू आणि औषध पुरवठादार यांना वगळण्यात आलेले आहे.

कापड, स्टेनलेस स्टील, सराफ, होजिअरी, ऑटोमोबाईल, प्लायवुड, टिंबर, नॉन फेरस, मेटल पेपर, प्लॅस्टिक, इलेक्ट्रिक ऍन्ड इलेक्ट्रॉनिक, टॉयस, मशिनरी व वेल्डींग, कॉम्प्युटर, घड्याळे, सायकल, केमिकल, रविवार पेठ, व्यापारी आदी सर्व संघटनांचे प्रतिनिधी यात उपस्थित होते. सर्वांनी बंद मध्ये सहभागी होत शासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद
- रोनाल्डो आणि मेसी 3 वर्षानंतर येणार समोरासमोर, गोल्डन तिकीट 22 कोटी रुपयांना विकले : Ronaldo vs Messi
- सुनील शेट्टीचे खंडाळा मधील आलिशान फार्म हाऊस
- Best Pawna Lake Camping For Couples: Top 3 Pawna Camping