Pune Corona : पुण्यात फक्त या गोष्टी सुरू राहणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0
Pune Corona : पुण्यात फक्त या गोष्टी सुरू राहणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Corona चा वाढता प्रभाव लक्षात घेता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुण्यातील अत्यावश्यक सुविधा वगळता बाकी सर्व सुविधा, ठिकाणे बंद करण्याचा आदेश दिला आहे.

Pune Corona मुळे कोणकोणत्या सुविधा सुरू राहणार

शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापने.

अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब.

सर्व प्रकारचे वैद्यकीय नर्सिंग महाविद्यालय

रेल्वे स्थानक, बस स्थानक, महानगर परिवहन थांबे आणि स्थानक, विमानतळ, रिक्षा थांबे.

अत्यावश्यक किराणा सामान, दुध/दुग्धोत्पादन विकणारी दुकानं, फळे व भाजीपाला, मेडिकल, जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्यास परवानगी राहील.

सर्व हॉटेल/लॉज चालकांना आरोग्यविषयक खबरदारी घेऊन ग्राहकांना खाद्य पदार्थ बनवून देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

माहिती व तंत्रज्ञान उद्योग: ज्यांच्याकडे अति महत्त्वाचे उपक्रमाची जबाबदारी आहे असे उपक्रम कार्यान्वित राहू शकतात. परंतु याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्याबाबत बंधनकारक आहे.

विद्यार्थी खानावळ तसेच महाविद्यालये, वसतिगृहांमधील मेस फक्त परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवता येणार आहे

प्रसारमाध्यमांची (दैनिक, नियतकालिक, वृत्तवाहिन्या) कार्यालये सुरू राहतील.

Pune Corona बाबत जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची प्रत

पुणे जिल्हाधिकारी परिपत्रक
पुणे जिल्हाधिकारी परिपत्रक

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.