पुणे तिथे काय उणे म्हणजे काय? ही पुण्यात सामान्यतः वापरली जाणारी एक म्हण आहे. अनेकवेळा आपण पुणेकर “पुणे तिथे काय उणे” असे म्हणताना पाहिले असेल.

चला तर आपण समजून घेऊयात की या म्हणी चा नक्की अर्थ काय?
उणे या शब्दाचा अर्थ आहे वजा, नकारात्मकता, कमतरता किंवा दोष.
मग पुणे तिथे काय उणे का म्हणतात?
पुण्यातील लोकांचा असा ठाम विश्वास आहे की पुण्यातील लोकांप्रमाणे पुणे मध्ये सुद्धा कसलीही कमतरता नाही. पुणे परिपूर्ण असून यात कसलीही कमतरता किंवा दोष नाही.
पुण्यात कोणतीही कमतरता नाही असे पुण्यातील लोकांना का वाटते?
पुण्याला “सांस्कृतिक राजधानी” म्हणून ओळखले जाते. पुण्याचा इतिहास खूप मोठा आहे. शिवाजी महाराज जन्मभूमी ते कर्मभूमी राहिलेल्या पुण्याचा इतिहास बाकी शहरांपेक्षा नक्कीच मोठा आहे. पेशव्यांच्या काळातील पुण्याची श्रीमंती ते मराठ्यांची राजधानी राहिलेला राजगड सुद्धा पुण्यातच आहे. महात्मा फुले यांनी भारताची पहिली मुलींची शाळा काढली, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी खाल्लेल्या खस्ता असुद्या, पेशवाईचा मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा असुद्या, लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्यसंग्रामातील लढा असुद्या पुणेकर कायम अग्रणी राहिले आहेत.
पुण्याला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून देखील ओळखले जाते. पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर आहे. शिक्षण क्षेत्रात शाळा, महाविद्यालये, संस्था या समृद्ध आहे. पुणे विद्यापीठ देशातील प्रमुख विद्यापीठाच्या यादीत येते. अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांचे जाळे संपूर्ण पुण्यात पसरले असून अनेक वैद्यकीय महाविद्यालय या पुण्यात आहेत. याच महाविद्यालयातुन शिकून भारतात अनेक पुणेकरांनी आपले नाव प्रस्थापित केले आहे.
प्रसिद्ध संशोधक जयंत नारळीकर हे देखील पुण्याचेच. पुणे हे भारतीय शास्त्रीय संगीतासाठी अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात ‘सवाई गंधर्व’ हा शास्त्रीय संगीत कार्यक्रम आयोजित केला जातो. पुण्याचा सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे. पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा पुणे गणेशोत्सव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक वारसा बरोबर पुणे गडकिल्ल्याने समृद्ध आहे. म्हणूनच म्हणतात… “पुणे तिथे काय उणे”
पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणे
- आगाखान पॅलेस,
- शनिवारवाडा
- सिंहगड
- पर्वती
- मोराची चिंचोली
- कार्ला लेणी
- राजगड
- तोरणा
- एकविरा देवी
- श्रीमंत दगडूशेठ
- पुण्यातील पर्यटनस्थळे
पुण्यामध्ये सर्वाधिक जलसंपदा म्हणजे धरणे व नद्या आहेत त्याबरोबरच शहर विकसित असून सर्व सोयीसुविधा देखील आहेत.
म्हणूनच म्हणतात… “पुणे तिथे काय उणे”
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.