पुणे विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरू

0
पुणे विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा २०२१ च्या प्रथम सत्राच्या परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत. त्याचे विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर केले जात आहे.

पुणे विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा माँक टेस्ट

मुख्य परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची एक संधी देण्यात येणार आहे. १०, ११ व १२ फेब्रुवारी रोजी बहुतांशी परीक्षांची सराव चाचणी घेण्यात येणार आहे.

प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच इतर समकक्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षा उशिरा असल्याने त्यांच्या सराव परीक्षा १९ व २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येतील

ऑनलाइन परीक्षा घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी समजण्यासाठी सराव परिक के घेतली जाणार आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लॉग इन करता यावे, याकरता त्यांच्या ई-मेल आयडीवर ‘लॉग इन’चा तपशील पाठवला जाणार असून, एकूण सहा लाख ४८ हजार विद्यार्थ्यांना मेल करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

© PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.