पुणे विद्यापीठ वेबसाइट अवघ्या ३ मिनिटांत हॅक

0
पुणे विद्यापीठ वेबसाइट अवघ्या ३ मिनिटांत हॅक

पुणे विद्यापीठ ज्याला ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळखले जाते त्यांची वेब साईट चक्क ३ मिनिटांत हॅक करण्याचा करिश्मा एका तरुणाने करून दाखवला आहे.

विद्येचे माहेरघर पुणे मधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जुन्या विद्यार्थ्याने विद्यापीठाची वेबसाइटची सुरक्षा पातळी तपासत त्यातील त्रुटी उघड केल्या आहेत. इथिकल हॅकर श्रेयस गुजर याने SPPU च्या वेब साईट च्या सुरक्षेतील एक मोठी त्रुटी शोधून काढत १०८ देशांतील ७.५० लाख विद्यार्थ्यांचा, तसेच पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक प्राध्यापकांची माहिती धोक्यात येण्यापासून वाचवली आहे. श्रेयस ने शोधलेल्या त्रुटी विद्यापीठाला कळवल्यानंतर विद्यापीठाने समस्येचे निराकरण करत प्रणालीतील विसंगती दर्शविल्याबद्दल गुजर याला कौतुक पत्र देत सन्मानित केले आहे.

मी एक MCS विद्यार्थी असून प्रमाणित हॅकर आहे, “मी फर्ग्युसन कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. मी जिज्ञासेने SPPU चे शिक्षक पोर्टल हॅक केले होते आणि माझे अंतर्गत गुण तपासले होते. मात्र, मी कोणतीही दुरुस्ती केली नाही. मार्च २०२१ मध्ये, विद्यापीठाने पूर्ण-प्रूफ डिजिटल सुरक्षा उपाय केले आहेत की नाही हे तपासण्यासाठी मी पुन्हा एकदा पोर्टल हॅक केले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तिसऱ्यांदा मी पोर्टल हॅक केले. अवघ्या तीन मिनिटांत हे करणे शक्य झाले होते.

श्रेयस गुजर पुणे मिरर शी दिलेल्या मुलाखतीत सांगत होता

श्रेयस गुजर ने विद्यापीठाच्या वेब साईट मधील त्रुटी समजल्यानंतर याबाबत मेल द्वारे विद्यापीठाला कळवले होते परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे श्रेयस ने वैयक्तिकरित्या भेट देत आयटी सेल प्रमुख अमलापुरे यांना हॅकिंगचे प्रात्यक्षिक करून दाखवले. दोन दिवसांनंतर त्यावर IT सेलकडून ईमेल प्राप्त झाला की पोर्टलची समस्या सोडवण्यात आलेली आहे. त्यांनी त्याच्या कामाचे कौतुक करत श्रेयस ला कौतुकास्पद प्रमाणपत्रही दिले आहे.

©PuneriSpeaks

© PuneriSpeaks

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.