Pune Unlock 1.0: काय सुरु होणार, काय बंद राहणार?

0
Pune Unlock 1.0: काय सुरु होणार, काय बंद राहणार?

Pune Unlock 1.0: पुणे कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी Unlock 1.0 नियमावली आणली आहे. कोरोना प्रभाव कमी करण्यासाठी पालिकेने कठोर निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क बंधनकारक असून न वापरल्यास 500 रुपये दंड तरतूद करण्यात आली आहे. उद्याने, मंडई, तुळशीबाग सुरू होणार आहे. उद्याने पहाटे 5 ते सायंकाळी 7 अशी उघडी राहणार आहेत. महापालिकेने नवी नियमावली आणि नवीन कंटेनमेंट झोन यादी जाहीर केली आहे.

पुण्यात काय काय बंद राहणार?

 • शाळा
 • महाविद्यालय
 • खाजगी क्लास
 • मॉल्स
 • जलतरण तलाव
 • चितपटगृह
 • क्रीडांगणे
 • केशकर्तनालय/ब्युटी पार्लर, स्पा.
 • हॉटेल, उपाहारगृहे आणि अन्य आदरातिथ्य करणाऱ्या सेवा.
 • व्यायाम शाळा,
 • करमणुकीची ठिकाणे, नाट्यगृहे सामाजिक/राजकीय/क्रीडा/करमणूक/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम आणि कोणतेही कारणाने होणारी मोठी गर्दी.
 • धार्मिक स्थळे

पुण्यात काय काय सुरु होणार?

मॉल व व्यापारी संकुल वगळता सर्व व्यापारी क्षेत्रे, तुळशीबाग, हाँगकाँग लेन आणि रस्त्यावरील दुकाने आळीपाळीने (P-1,P-2 पद्धतीने) मुख्य रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम दिनांकाच्या दिवशी व दुसऱ्या बाजूची दुकाने विषम दिनांकाच्या दिवशी पुढील नियमाप्रमाणे उघडतील. मुख्य रस्ता पूर्व-पश्चिम असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम दिनांकास आणि मुख्य रस्ता दक्षिण-उत्तर असल्यास रस्त्याच्या पूर्व बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर पश्चिम बाजूकडील दुकाने विषम दिनांकास उघडी राहतील. नमूद व्यवसाय हे सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० पर्यंत अटींच्या धीन राहून खुली राहतील.

सुरक्षा व सेवा व्यवस्था: रहिवासी संकुल व कार्यालयांना व्यवस्थित ठेवण्यासाठी लागणाऱ्या सेवा व सुरक्षा पुरवण्याच्या खाजगी संस्था सुरु राहतील.

बांधकाम विषयक: प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बाहेरील मजूर न आणता कामाच्या जागेवर मजुरांची राहण्याची व्यवस्था होत असेल, तर अशी बांधकामे आणि अपारंपरिक उर्जा प्रकल्पांची कामे करता येतील.

खाद्य पदार्थांची सेवा: खाद्य पदार्थांची पार्सल सेवा देणारे व्यवसाय सुरु ठेवता येतील.

माहिती तंत्रज्ञान: माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यवसाय त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५०% कर्मचाऱ्यांवर सुरु ठेवता येतील. तसेच डाटा व कॉल सेंटर कमीत कमी कर्मचाऱ्यांचा वापर करून सुरु ठेवता येतील.

ई-कॉमर्स: ई-कॉमर्सच्या माध्यमातून घरपोच वस्तूचे वितरण करता येईल. तसेच कुरिअर सेवा सुरु राहतील.

वित्तीय क्षेत्र: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी नियंत्रित केलेल्या आर्थिक संस्था या कमीत कमी कर्मचारी वापरून कामकाज सुरु ठेवू शकतील. तर ATM, बँका, सहकारी पतसंस्था, विमा कंपन्या यांची कार्यालये सुरू राहतील.

वर्तमानपत्रे: वर्तमानपत्राचे वितरण हे वर्तमानपत्रे घेणाऱ्या व्यक्तीच्या सहमतीने वितरीत करता येतील. मात्र याकरिता वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक राहील. तसेच, इलेक्ट्रॉनिक मिडीया, केबल सर्व्हिस सुरु राहतील.

घरकाम करणाऱ्या व्यक्ती: प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठिकाणी घरकाम करण्यास मनाई करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी, घर मालकाची इच्छा असल्यास स्वच्छेने काम करता येईल.

घराबाहेरील व्यायामा: वैयक्तिक व्यायाम, सायकलींग, जॉगिंग, धावणे, चालणे या बाबी सार्वजनिक मोकळे मैदान, पुणे महापालिकेची मैदाने व उद्याने, संस्था/सोसायटीची मैदाने, उद्यान या ठिकाणी खालील अटींच्या अधीन राहून करता येईल. कोणतीही क्रिया बंदिस्त भागात केली जाणार नाही.

Pune Unlock 1.0 नियमावली

कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण/ सेवा वगळता रा ९ ते स ५ वाजेपर्यंत घराबाहेर जाता येणार नाही. ६५ वयोगटापेक्षा अधिक, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, १०वर्षापेक्षा कमी वय असलेली मुले यांना अत्यावश्यक सेवा व आरोग्य विषयक अडचणीशिवाय घराबाहेर जाता येणार नाही

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.