पुणे लसीकरणाचा विक्रम, महिनाभरात पुण्याचे लसीकरण होणार !

0
पुणे लसीकरणाचा विक्रम, महिनाभरात पुण्याचे लसीकरण होणार !
Share

पुणे लसीकरणाचा विक्रम झाला असून पालिकेला मिळालेल्या मुबलक लसीमुळे पुण्याचा लसीकरणाचा नवीन विक्रम झाला आहे. Pune Municipal Corporation ने आत्तापर्यंतचा लसीकरणाचा स्वतःचाच उच्चांक मोडत ५० हजारांचा आकडा गाठला आहे.

पुणे महापालिका लसीकरण वेगाने होत असून २६, २७ आणि २८ जून या तिन्ही दिवसांत मिळून तब्बल १ लाख २ हजार ६०३ जणांचे विक्रमी लसीकरण झाले आहे. यात कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्हीही लसींचा समावेश आहे. मोफत सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही केंद्रावर सध्या लस उपलब्ध असून पुणेकरांचा प्रतिसादाबरोबर लसीकरणाची संख्याही वाढत चालली आहे. सध्या पुण्याची लसीकरणाची क्षमता ६० हजार च्या आसपास असून ५० हजारांचा टप्पा पार झाला आहे.

पुण्यात किती लोकांचे लसीकरण झाले आहे?

२८ जून पर्यंत पुणे पालिका क्षेत्रातील पहिला डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या १३ लाख१२ हजार ५४९ इतकी आहे, तर दुसरा डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या ३ लाख ६० हजार ९७० इतकी आहे.  आणखी सुमारे २५ लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचं बाकी असून सध्या २९६ केंद्रावर उपलब्धतेनुसार लस दिली जात आहे.

लसीकरणाचा वेग येत्या काळात अजून वाढल्यास संपूर्ण पुण्याचे लसीकरण पहिला डोस पूर्ण व्हायला ३०-४० दिवसांचा अवधी लागू शकतो. आणि तेथून पुढील ३ महिन्यात कोव्हीशिल्ड लसीकरण पूर्ण होऊ शकते. पालिकेच्या उत्तम धोरणामुळे लसीकरण यशस्वी होत आहे.

पुणे लसीकरण पद्धत

कोव्हीशिल्ड: सध्या १८+ साठी ७०% ऑनलाईन तर ३०% ऑनस्पॉट नोंदणी असे लसीकरण होत आहे. ४५+ वाल्यांसाठी ३०% ऑनलाईन दुसरा, ३०% ऑनस्पॉट दुसरा, २०% ऑनलाईन पहिला तर २०% ऑनस्पॉट पहिला असे लसीकरण होत आहे.

कोवॅक्सिन: १८+ दुसरा डोस साठी ५०% ऑनलाईन तर ५०% ऑनस्पॉट नोंदणी असे लसीकरण होत आहे. सध्या फक्त दुसरा डोस उपलब्ध आहे.

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.