अजितदादांकडे मदतीची हाक, पोलिसाच्या बायकोला जाग्यावर न्याय, नवऱ्यावर गुन्हा दाखल

0
अजितदादांकडे मदतीची हाक, पोलिसाच्या बायकोला जाग्यावर न्याय, नवऱ्यावर गुन्हा दाखल
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्वभाव अनेक जवळच्यांना माहीत आहे. अनेक विषय जागच्या जागी सोडवण्याची त्यांची खासियत आहे. अशीच एक घटना पुण्यात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर घडली.

Pune Women Complaining about police husband

शुक्रवारी पुणे कौन्सिल आवारात कौटुबिंक हिंसाचारामुळे पीडीत महिलेने थेट अजितदादांना गाठले आणि आपल्यावर होत असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराचा पाढाच वाचला. बैठकीला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता देखील उपस्थित असल्याने अजितदादांनी मग जागेवरून पुणे पोलिस आयुक्तांना हाक मारली, ”अहो पोलीस कमिशनर…, हे पाहा. आम्ही पोलिसांच्या चांगल्या कामाचं एकाबाजूनं कौतुक करतो, अन दुसरीकडं तुमचे पोलीस काय करतायेत?”. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता धावतच पवार यांच्याकडे आले.

पीडित तरूणीने आपली तक्रार सांगत निवेदन पवार यांच्या हातात दिले. पवार त्या निवेदन वाचताना आपली व्यथा तरुणीने सांगितली.

तरुणीची तक्रार

‘तरुणीने दिलेल्या निवेदनानुसार तिचा नवरा आणि सासरे दोघेही तिच्यावर माहेराहून पैसे आणायचा दबाव आणत आहेत. नवरा पुणे ग्रामीण पोलीस मध्ये असून सासरा पोलीस खात्यातून निवृत्त झाला आहे. तरुणीने तिला मारहाण झाल्याची सुद्धा तक्रार केली आहे. तरुणीला लहान मुलगी असून चिमुकलीच्या बोटाला धरून आपली व्यथा तरुणीने पालकमंत्री पवारांच्याकडे मांडली.

पवारांनी जाग्यावरच विषय मिटवत थेट पोलीस आयुक्तांनाच याबाबत लक्ष घालण्यास सांगितले. ‘चौकशी करा, त्याला चांगला दम द्या, असं चालणार नाही म्हणावं त्याला.” असे आयुक्तांना सुनावले.

मग त्या तरूणीकडे वळून पवार म्हणाले

अजित पवार: ”तू काय शिकली आहेस ?”

तरुणी: ”मी बी. कॉम. झालीये, साहेब.”

अजित पवार: ”ठीक आहे, पाहातो”

यानंतर पोलीस आयुक्त गुप्ता यांनी ”मी चौकशी करतो साहेब,”असे म्हणत पुढची सूत्रे हलवली आणि पवार भवनात निघून गेले.

तरुणीच्या तक्रारीनंतर काय घडले?

यानंतर लगेच आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित पोलीस नाईक असलेल्या पतीसह सासरच्यांवर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार, मारहाण तसेच धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील चौकशी पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत. त्या तरूणीचा पती पोलीस नाईक योगेश पुरूषोत्तम सवाने (32), सासरे पुरूषोत्तम भिमराव सवाने (69), सासू आशा पुरूषोत्तम सवाने (60), दीर प्रसाद पुरूषोत्तम सवाने (29), नणंद योगिता रत्नाकर बनसोडे (30, रा. सर्वरा. आउंडे, लोणावळा, ता. मावळ जि. पुणे) आणि दादा भिमराव सवाने (60, रा.तळेगाव) यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजितदादांनी जागेवर केलेल्या आदेशामुळे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.