पुण्यात धक्कादायक घटना! फेसबुकवरील मैत्रीतून तरुणीवर बलात्कार

0
पुण्यात धक्कादायक घटना! फेसबुकवरील मैत्रीतून तरुणीवर बलात्कार
Share

पुणे: हडपसर भागातील तरुणीने बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. सोशल मीडियावर (फेसबुक) वरून ओळख झालेल्या आरोपीकडून बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फेसबुकवर ओळख करून तरुणीला बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  

३७ वर्षाचा पंकज रामनाथ उदावंत असे आरोपीचे नाव असून त्याला मांजरी, हडपसर येथून अटक करण्यात आली आहे.

नक्की काय घडले होते?

मांजरी, हडपसर येथील आरोपी पंकज उदावंत याने फेसबुक वर ३४ वर्षीय महिलेस फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. यातून दोघांमध्ये ओळख निर्माण झाली. त्या दोघांमध्ये अनेकवेळा बोलणे होत होते. आरोपीने पीडित महिलेचा विश्वास संपादन करत पीडित महिलेस एप्रिल २०१८ मध्ये हडपसर येथे भेटण्यास बोलवले होते. पीडितेला त्याच्या बहिणीच्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले होते.

या व्हिडिओ आणि फोटोला सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अनेकवेळा पीडित महिलेवर अत्याचार केले. त्यानंतर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि फोटो फिर्यादीच्या भावाला एका व्यक्तीला शेअर केले. या प्रकारानंतर पीडित महिलेने समोर येत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला हडपसर मधून अटक केली आहे.

सोशल मीडियावरील झालेल्या ओळखीतून अशा घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिसांनी अनेकवेळा सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.