पिंपरी-चिंचवड शहरातील दहशत कमी करणे पोलिसांपूढे मोठे आव्हान बनत चालले आहे. त्यात आता शिवार गार्डन परिसरात तरुणांची पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन दमदाटी आणि अश्लील शिवीगाळ करण्यापर्यंत मजल मारली आहे.
नक्की काय घडले?
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू होती. यावेळी दुचाकीवरून निघालेल्या दोघांना पोलिसांनी मास्क न घातल्याने अडवले. अडवलेल्या तरुणाने चिडत पोलिसांच्या अंगावर धावून जात दमदाटी केली, वरून पोलिसांना शिवीगाळ सुद्धा केली. हा सर्व प्रकार आसपासच्या नागरिकांनी व्हिडीओत कैद केला आहे.

आरोपी अभिषेक राजू टेंकल (१८) राहणार विष्णुकृपा वसाहत आणि हरिश गणेश कांबळे (१९) राहणार साईबाबा मंदिर जवळ, शिवाजीनगर या दोघांनाही सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हरिश कांबळे वर आधीपासून एक गुन्हा दाखल असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
तुझ्या अंगावर वर्दी आहे म्हणून नाहीतर इथे दाखवलं असतं अशा पद्धतीने आरोपी पोलिसांना धमकावत होता. आरोपी अभिषेक टेंकल याला पोलीस संयमाने समजावत असताना सुद्धा तो अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून पोलिसांवरच ही वेळ येत असेल तर सामान्य लोकांचे काय होणार.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.