पुणेरी पाट्या जगभर प्रसिद्ध आहेतच. थोडक्या शब्दात जीवाला लागेल असा अपमान करण्याची मोठी ताकद या पाट्यांमध्ये आहे. पण त्यासाठी पुणेकर व्हायला लागते, नाहीतर असे शब्द सुचने तसे अवघडचं.
पुणे पोलिसांनी सुद्धा याच पुणेरी पाट्या चा आधार घेत मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्याना चांगलाच धडा शिकवला आहे. संचारबंदी असूनही अनेकजण सकाळी सकाळी चालायला, पळायला जात आहेत. यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
पोलिसांनी याबाबत अनेक जणांवर केस दाखल केल्या आहेत. अनेकांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. परंतु लोकं अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडत स्वतःच्या आणि दुसर्याच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत.
पुणे पोलिसांनी यावर शक्कल लढवत मॉर्निंग वॉक वर येणार्याच्या हातात पुणे पाट्या देत त्यांना धडा शिकवला आहे.




शेवटी पोलिस ही पुणेकर आहेत, लक्षात ठेवा.#पुणेरीपाट्या हातात देऊन माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना असा धडा शिकवला.@PuneCityPolice @PCcityPolice @CPPuneCity #StayAtHomeSaveLives @PuneriSpeaks @MahaGovtMic @PMCPune pic.twitter.com/ezMgQ5M0kp
— Sambhaji Patil (@psambhajisakal) April 22, 2020
तर कशी वाटल पुणे पोलिसांची शक्कल आणि पुणेकर पाट्या? आता हे नागरिक पुन्हा बाहेर फिरतील याची शाश्वती कमीच आहे. आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.