पुण्यात महाविद्यालयात शिकत असताना नाट्यवेड्या तरुणांना पुरुषोत्तम करंडक जिंकण्याचे स्वप्न आले नसेल तर तो नाट्यकार कसला.
पुण्यात ऑगस्ट महिना उजाडताच सुरु होते एकच किलबिल ती म्हणजे पुरुषोत्तम करंडक मध्ये सादर करत असलेल्या नाटकाच्या तयारीची.
पहिल्यांदा हि लगबग सुरु झाली ती १९६३ साली, जेव्हा “महाराष्ट्रीय कलोपासक” ने पुरुषोत्तम रामचंद्र वझे यांच्या स्मृतीपिर्त पहिल्यांदा ‘पुरुषोत्तम करंडक’ ची सुरुवात केली.
पहिल्यांदा जेव्हा १९६३ साली हा करंडक चालु झाला तेव्हा त्याचा विजेता विजय तेंडूलकर बाली लिखित आणि डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित B J मेडिकल कॉलेज झाले. आणि नंतर एक अविस्मरणीय कालखंड सुरु झाला तो आजपर्यंत चालुच आहे.
या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीची मुख्य अट म्हणजे तुम्ही विद्यार्थी असलेच पाहिजे मग बस्स्, गेल्या ५४ वर्षाच्या कालखंडात या स्पर्धेतून अनेक कलावंत घडत गेले आणि पुढे घड्तीलाच यात काही वाद नाही. तरुणपणातच नाटकाच्या विविध छटा या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना पहावयास मिळतात. या स्पर्धेतून अनेक मराठी कलावंत घडत गेले त्यातलेच काहीजण म्हणजे अमेय वाघ, डॉ. जब्बार पटेल, विक्रम गोखले, मोहन गोखले, सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये, सुबोध भावे आणि असे बरेच कलावंत या स्पर्धेतून जगासमोर येत गेले.
डॉ. जब्बार पटेल यांनी यानंतर सामना, सिंहासन, एक होता विदुषक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. आत्ताच नवीन नवीन अमेय वाघ सुद्धा याच स्पर्धेच्या सानिध्यातून वर आलेला पहावयास मिळतो.
सुरुवातीपासून ९, १५ असे करत करत सध्या जवळपास ५१ महाविद्यालय या स्पर्धेत भाग घेतात आणि बरेचसे महाविद्यालय प्रतीक्षेतच राहतात. करंडक च्या १७ दिवसाच्या कार्यक्रमामुळे ५१ महाविद्यालयांनाच या स्पर्धेत भाग दिला जातो.
गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत S P महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले होते त्यामुळे यावर्षी ते विजेतेपद राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्या पुढ्यात असेल.
स्पर्धेचे आकर्षण VIT, FC, MIT, SP, PICT, Cummins आणि इतर यासारख्या महाविद्यालयांमुळे अधिकच वाढले आहे.
यावर्षीची स्पर्धा गणपती लवकर आल्यामुळे ८ ऑगस्ट पासून चालू झाली असून पहिली फेरी हि २३ ऑगस्टपर्यंत रंगणार आहे. आनंद पानसे, रुपाली भावे आणि सचिन पंडित यंदाच्या स्पर्धेचे प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
या स्पर्धेची अंतिम फेरी गाठून विजेतेपद कोण पटकावतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.