प्रश्नकोडे छत्रपती शिवराय यांच्या आग्रा सुटकेचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
प्रश्नकोडे छत्रपती शिवराय यांच्या आग्रा सुटकेचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

प्रश्नकोडे छत्रपती शिवराय यांच्या आग्रा सुटकेचे.

रामसिंगाच्या आतला राजपूत जागा झाला. कितीही शूर हुशार असला तरी त्याची हुशारी मुघल सल्तनतकडे फितूर होती. न जाने किती फितुरांना शिक्षा देऊन त्यांचे बद्दुवे आलमगीर बादशहासाठी त्याने पचवले होते.

पण तरीही शिवरायांबद्दल असलेला आदर त्यामुळे तो “छत्रपती शिवराय यांच्या मृत्यूच पाप” डोक्यावर घेऊन जगू शकणार नव्हता. अस असल तरी तो बादशहाला दगा देऊन महाराजांना स्वतःहून वाचवू शकत नव्हता. म्हणून एक सांकेतिक संदेश संभाजी राजेन करवी महाराजांपर्यंत पोचवला.

छत्रपती शिवराय यांचा निश्चय पक्का नव्हता, आपले आजारपणाचे ढोंग हे अजून काही दिवस चालू ठेवत या संकटातून काहीतरी मार्ग काढण्याचा पण होता. पण मृत्यू तर उद्याच येऊन खडा होता. विचार चक्र सुरु झाली. विचार मनात होता आणि अधूनमधून खोटा खोटा खोकला त्या खोलीत घुमत होता.

कधी पहारेकरी जाळीदार खिडकीजवळ नंगी तलवार घेऊन कानोसा घ्यायला येत तेव्हा खोकल्याची ढास महाराजांना उगाचच लागत. आणि त्या सरशी मदारी थुकदानी घेऊन महाराजांसमोर पेश होत आणि महाराज त्यात थुंकत.

रात्र झाली, संभाजी राजे त्या रात्री खास औरंग्याची परवानगी घेऊन महाराजांच्या खोलीत त्यांच्या जवळ झोपले होते. तोच शिवरायांनी हिरोजी आणि मदारीशी काही बात करून चंद्र डोक्यावर घेतला. काही वेळाने एक पेटारा खोलीत आला. राजेंनी त्याला आपले पवित्र हात लावले. आणि पेटारा बाहेर निघाला. पेटारा बाहेर जाताना पेटाऱ्यातून बाहेर थोडासा शेला लोंबत होता. आत शिवा आहे अस ग्रह धरून पेटारा पहारेकर्यांनी पुरता रिकामा केला. शिवा आत नव्हता. पुन्हा पेटारा भरून पेटारा बाहेर निघाला किल्ल्याबाहेर गरिबांना दान करण्यासाठी.

हिरोजीने घडलेली घटना राजेंना आल्यावर सांगितली. मग गोधडी अंथरून मदारी आणि हिरोजी खालीत झोपले. पलंगावर स्वराज्याचे छत्रपती आणि युवराज झोपले होते. पहाट झाली तसा महाराजांनी हिरोजीस आवाज दिला. तसे हिरोजी मदारी जागे झाले. छत्रपती शिवराय महाराजांनी पांघरूणाच्या आतूनच कपडे काढले. आणि खाली हिरोजी ही कपडे काढू लागले. महाराजांनी आपला हात पुढे केला. तसे ते कपडे घेऊन हिरोजीने आपली कपडे राजेंना दिले. मग झाली जागा पलटी. छत्रपती शिवराय हिरोजी झाले आणि हिरोजी झाले छत्रपती शिवराय.

हिरोजी संभाजी राजेंच डोक आपल्या हातावर घेऊन झोपी गेले. काही वेळाने शंभूराजे उठले आणि आवरून ठरल्याप्रमाणे पळून जाण्यासाठी कुंभारवाड्यात थांबले. पण मग मला एक प्रश्न पडतो, जुना इतिहास बोलतो कि रोज रोज कित्येक पेटारे तपासून पहारेकार्यांचा विश्वास बसला होता त्या पेटारातल्या मिठाई आणि फळांवर म्हणून नंतर पहारा ढिला पडला.

छत्रपती शिवराय आग्रा सुटका
मग दोन्ही राजे पेटाऱ्यातून फरार झाले. पण अस नव्हत. गफलत मतलब सजा–ए-मौत. अशी शिक्षा औरंग्याची होती. मग ती सेना अशी गफलत करेलच कशी? कुणाचा जीव स्वस्त झाला होता? औरंग्याला आपल्या आलमगीर जहापनाहला दगा देईलच कोण? याचा अर्थ महाराज पेटाऱ्यातून नाही तर हिरोजी बनून तो पेटारा खांद्यावर घेऊन कुंभार वाडी पर्यंत गेले असावेत. आणि खोली बाहेर फिरत असणारे सैन्य आत शिवाजी राजेंना (हिरोजीना) गाढ झोपलेलं बघून चकवा खाऊन गेल. त्यामुळे लगेच काही कुणास ही बात समजली नाही.

त्यानंतर मदारी दवा आणायला खोली बाहेर पडले आणि मग तसेच किल्ल्याबाहेर. लोड, उश्यांचा काल्पनिक सम्राट त्या पलंगावर झोपवून हिरोजीही तिथून फरार झाले. आग्र्याची सुटका पेटारीतून झाली का पेटारी खांद्यावर पेलून झाली? कुणास ठाऊक पण यातल सत्य जानण्याच कुतूहल मला जाम आहे. बाकी खरे काय ते छत्रपती शिवराय महाराज साहेबच जाणे!

लेखक: अजिंक्य भोसले.
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

लेख आवडल्यास नक्की शेअर करा….

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहेत

कोणीही लेख चोरू नये. दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.