अर्थतज्ञ रघुराम राजन यांना मिळु शकते यावर्षीचे नोबेल ?️?

0
अर्थतज्ञ रघुराम राजन यांना मिळु शकते यावर्षीचे नोबेल ?️?

सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश आहे. ‘क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स’ने नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केली आहे. रघुराम राजन यांनाही या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स अॅकॅडमी ही एक संशोधन संस्था आहे. ते आपल्या संशोधनावरून नोबेल पुरस्कारांच्या संभावित विजेत्यांची यादी तयार करतात. वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार राजन हे त्या सहा अर्थतज्ज्ञांपैकी एक आहेत ज्यांना क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्सने यावर्षी आपल्या यादीत समाविष्ट केले आहे. कॉर्पोरेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. सर्वात कमी वयाचे (४०) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) प्रमुख झालेले राजन हे २००५ मध्ये शोध निबंध सादरीकरण केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले. राजन यांनी अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर सादरीकरण केलं होतं. त्याचवेळी राजन यांनी आर्थिक मंदीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांचं म्हणणं हसण्यावारी नेण्यात आलं होतं. तीन वर्षांनतर रघुराम राजन यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत ओढली गेली.

रघुराम राजन यांना आरबीआयच्या गव्हर्नरपदाची दुसऱ्यांदा संधी मिळेल असे वाटले होते. परंतु, राजन हे आपला कार्यकाळ संपल्यानंतर शिकागो विद्यापीठातील स्कूल ऑफ बिझनेसमध्ये परत गेले होते. राजन यांनी नंतर अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या आणि आपल्या मतात फरक असल्याचे म्हटले होते. यामध्ये नोटाबंदीचा एक निर्णय होता. त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली होती.

 
Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.