नवी दिल्ली – दिल्लीत क्रुरपणे अत्याचार झालेल्या निर्भयाच्या आईने त्यांच्या मुलाला वैमानिक बनण्यासाठी मदत केल्यामुळे राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत.
निर्भयाची आई आशा देवी यांनी सांगितले की, अमन (बदललेले नाव) हा आज फक्त राहुल गांधी यांच्या मदतीमुळेच वैमानिक होऊ शकला आहे. तो वैमानिक झाल्याने आमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले आहे. निर्भयावर अत्याचाराची घटना घडली, त्यावेळी अमन बारावीत शिकत होता. त्याला या प्रकरणामुळे धक्का बसला होता. पण, राहुल गांधी यांनी सतत त्याला भेट देऊन त्याला मानसिकदृष्ट्या सक्षम करत गेले. तसेच त्याचा शिक्षणाचा खर्चही उचलला. शिक्षण झाल्यानंतर त्याला लष्करात भरती व्हायची इच्छा होती. पण, राहुल गांधी यांनी त्याला वैमानिक होण्याचा सल्ला दिला. त्याला 2013 मध्ये रायबरेलीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अकादमीमध्ये प्रवेश घेतला. रायबरेलीत राहत असताना त्याला अनेक अडचणी आल्या असताना त्याने सर्व पार केल्या. सरावाच्या काळात तो सतत निर्भयाच्या खटल्याबाबत माहिती घेत होती. तसेच तो राहुल गांधींच्याही संपर्कात होता. त्यांनी त्याला कायम वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. आता त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, गुरुग्राममध्ये अंतिम प्रशिक्षण घेत आहे. आता तो लवकरच स्वतः विमान चालवू शकणार आहे. राहुल यांच्यासह त्यांची बहिण प्रियांकाही अमनला सतत प्रोत्साहन देत होती.
राहुल गांधी यांच्यामुळेच माझा मुलगा वैमानिक : निर्भयाची आई
