राहुल फटांगडे ला न्याय मिळवुन देण्यासाठी सोशल मीडिया एकवटला… #Justice4Rahul

0
राहुल फटांगडे ला न्याय मिळवुन देण्यासाठी सोशल मीडिया एकवटला… #Justice4Rahul

राहुल फटांगडे एक ऑटोमोबाईल गॅरेज चालवणारा साधारण तरुण, कोणाच्याही अध्यात मध्यात नसणारा शांत स्वभावाचा तरुण

पुणे शहरात सनसवाडी पासून २० किलोमीटर अंतरावर चंदन नगर येथे त्याचे गॅरेज होते. राहुल फटांगडे यांनी १ तारखेला नवीन वर्ष आणि भीमा-कोरेगाव ला होणार्या गर्दीमुळे त्या दिवशी सुट्टी घेतली होती. सायंकाळच्या वेळी घरी परतत असताना गावातील पेट्रोल पंपाच्या शेजारी एक घोळका जमला होता. दुपारच्या आसपास भीमा-कोरेगाव भागात दोन गटात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. सायंकाळी एक घोळका गावातील पेट्रोल पंपाजवळ जमलेला असताना त्यांची नजर राहुल फटांगडे याच्यावर गेली. त्याने अंगावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले जॉकेट घातलेले होते. त्यावरून हा तरुण मराठा समाजातील असावा असा अंदाज घेत जमावाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात त्या तरुणाचा नाहक जीव गेला.

राहुल फटांगडे च्या मृत्यूनंतर सनसवाडी रहिवाशांना चांगलाच धक्का बसला आहे. तो दंगलीत सहभागी नसूनही त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जॉकेट घातले होते म्हणून त्याला प्राणाला मुकावे लागल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या खुनाची FIR दाखल केली गेली असून “तपास चालू आहे आणि खुनींची ओळख पटलेली नाही” असे इन्स्पेक्टर दयानंद गावडे यांनी सांगितले.
या घडलेल्या घटनेत बळी गेलेल्या राहुल फटांगडे ला न्याय मिळावा, यासाठी संपूर्ण सोशल मीडिया एकवटला आहे. #Justice4Rahul या हॅशटॅग चा वापर करून फेसबुक तसेच ट्विटवर अनेकजण व्यक्त होताना दिसत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरुन याप्रकरणी सरकारला लक्ष्य केलं जातंय. राहुल फटांगडे च्या जागी राजकारणी, उद्योगपती किंवा एखाद्या श्रीमंताचा मुलगा असता तर लोकप्रतिनिधी आणि माध्यमं गप्प बसली असती का? असा प्रश्न विचारला जात आहे. कर्ता मुलगा गेल्याने त्यांच्या घरावर आभाळ कोसळले असून माझ्या मुलाची चुक काय असा काळजाला चीर पाडणारा  प्रश्न त्याची आई विचारत आहे.
सोशल मिडीयावर भरपूर जन #Justice4Rahul या हॅशटॅग वर आपापल्या भावना मांडत होते त्यातील काही आर्त भावना:

१.

२.

३.

४. नितेश राणे सुद्धा यात ट्वीट करत न्याय मिळवून देण्याची हमी दिली.

५.

६.

७.

८. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा यावर भाष्य करत दंगल करणार्यांना चपराक लगावली

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

या घटनेवरून सरकार, मिडिया आणि राजकारणी यांच्यावर खापर फोडले जात असून राहुल फटांगडे याला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरत आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

More:

छत्रपतींचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मराठा तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

भीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय : शरद पवार

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.