सीआयडी ने राहुल फटांगडे च्या मारेक-यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून माहिती देणा-यास सीआयडी बक्षीस देणार आहे.
1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचारात राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाची निर्घृण हत्या झाली होती. या गुन्ह्याचा तपास सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे पथकातर्फे चालू असुन उसळळेल्या हिंसाचाराची व्हिडीओ क्लीप पोलिसांच्या हाती लागली असून जमावातील काही लोक अतिशय निर्घृणपणे राहुल फटांगडेला मारताना दिसत आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून आणखी चौघांचा शोध सुरू आहे. पोलिसांची शुक्रवारी त्यांची छायाचित्रे प्रसिध्द केली आहेत.
तीन मिनीटांची ही व्हिडीओ क्लीप दिसत आहे त्याच ठिकाणी राहुल फटांगडेचा मृतदेह सापडला होता. व्हिडिओमध्ये सुरुवातीला काही लोक रस्त्यावर धुडगूस घालताना दिसत असून काही वेळाने हा जमाव पळत जाऊन रस्त्याशेजारी असलेल्या झुडूपात राहुल फटांगडे याला काठीने मारताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांनी राहुलची हत्या केल्याचे कबूल केल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे पथकाचे पोलीस अधीक्षक प्रसाद अक्कानवरू यांनी सांगितले.
Rahul Phatangare Murder Video| राहुल फटांगडे खून व्हिडिओ
अजुन बाकीचे आरोपी मोकाट फिरत असून त्यांचा शोध घेण्यासाठी CID ने आरोपींचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहेत तरी आरोपींचे नाव, पत्ता कुणाला माहित असल्यास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे स्टेशन येथील कार्यालयात कळवावी अथवा 9049650789 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक प्रसाद अक्कानवरू यांनी दिले असुन त्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
राहुल फटांगडे ला न्याय मिळवुन देण्यासाठी सोशल मीडिया एकवटला… #Justice4Rahul