रेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण

0
रेल्वेमध्ये पाईंटमन मयूर शेळकेच्या पराक्रमाचा थरार; गुलाम चित्रपटाची आठवण
Share

राजधानी भी तेरेको सँल्युट करेगी

शनिवार दिनांक १७/०४/२०२१ रोजी सायंकाळी १७ वाजून ४ मिनीटांनी मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकात एक थरारक घटना घडली..रेल्वे फलाटावरून चालत जाणाऱ्या एका अंध महिलेच्या हाती असलेला लहान मुलगा तोल जावून खाली रेल्वे रूळावर पडतो, त्याचवेळी तेथे रेल्वेमध्ये पाईंटमन म्हणून नोकरीत असलेला युवक मयूर शेळके तेथून जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कामासाठी तेथे उपस्थित होता.मयूर ने त्या मुलाला रेल्वे रूळावर पडलेले पाहिले आणि समोरून धडधडत येणारी उद्यान एक्स्प्रेस देखील पाहिली.तो मुलगा मयूर पासून जवळपास १०० मीटरवर पडला होता आणि समोरून एक्स्प्रेस देखील येताना दिसत होती,तरीही आपल्या जीवाची पर्वा न करता, मयूर त्या मुलाला वाचवण्यासाठी त्या एक्स्प्रेसच्या वेगाच्याहून जास्त वेगात धावला आणि त्या मुलाच्या जवळ पोहचला आणि काही सेकंदाच्या फरकाने मयूरने त्या मुलाला उचलून फलाटावर ठेवले आणि स्वतः देखील फलाटावर उडी मारली…हे दृश्य सर्व जगाने CCTV च्या माध्यमातून पाहिले आणि मयूरचा पराक्रम जगासमोर आला…

१९९८ साली अमिर खानचा गुलाम हा चित्रपट आला होता.या चित्रपटात एक प्रसंग होता, ज्यात काही उनाडटप्पू मुलं रेल्वेच्या समोर धावण्याची शर्यत लावतात, या चित्रपटाचा नायक असलेला अमिर खान या शर्यतीत भाग घेतो आणि रेल्वेच्या समोर धावताना रेल्वे रूळावर पडलेल्या दिपक तिजोरीला सेकंदाच्या फरकाने बाजूला करून स्वतः बाजूला होतो आणि तो ती शर्यत जिंकतो, हा प्रसंग चित्रपटात पहाताना अक्षरशः अंगावर शहारे यायचे.पण हे चित्रपटातील दृश्य होतं ते ठरवून सर्वोतोपरी सुरक्षेची काळजी घेवून आणि अनेकवेळा रिहर्सल करून तसेच अनेक रिटेक घेवून चित्रीत केलेलं असतं.ते जितकं थरकाप उडवणारं वाटत असलं तरी ते एक नाटयंअसतं..

पण मयूरने केलेल्या धाडसासाठी कोणतीच स्क्रीप्ट नव्हती ना डायरेक्शन होतं ना रिहर्सल होती ना रीटेक होता..होतं फक्त धेय्य आणि विश्वास.. या धाडसात ९९% जीव जाण्याची शक्यता होती पण स्वतः वरील विश्वास आणि नियतीच्या पाठबळामुळे मयूर ने त्या मुलाचे प्राण वाचवून स्वतः देखील सुरक्षित राहून आलेल्या संकटावर मात केली..

या गुलाम चित्रपटातच एक डायलॉग आहे..”चार्ली जब भागता है ना तो राजधानी भी उसको सँल्युट करती है!!” पण तो तर सिनेमा होता,त्यात जे घडतं ते नाट्य असतं पण मयूर ने केलं ते अस्तित्वात होतं,खरं होतं,सत्य होतं..म्हणून म्हणावसं वाटतं मयूर ..जब भी तेरे सामनेसे राजधानी गुजरेगी तब “राजधानी भी तेरेको सँल्युट करेगी!”

Pk…..प्रफुल्ल कदम.. (लेखक)

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.