हवामान खात्याने ऐन दिवाळीत पावसाची शक्यता आहे असे वर्तविले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. 2 नोव्हेंबरनंतर चार ते पाच दिवस पावसाळी स्थिती असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या वर्षात कोणत्याही महिन्यात पाऊस पडत होता. मागील वर्षी दिवाळीत पश्चिम महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र येथे मुसळधार पाऊस पडला होता. यावर्षी पुणे भागात थंडी जाणवायला लागली असतानाच पुन्हा एकदा दिवाळीत पाऊस पडणार असे सांगण्यात आले आहे.
दक्षिण आणि पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल अशी शक्यता आहे. हा पट्टी निर्माण झाला तर 2 ते 10 नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता कमी आहे. तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पाऊस 6 ते 11 नोव्हेंबरदरम्यान पडले, अशी शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी पाउसाच्या दृष्टीने तयार रहावे असे सांगण्यात येत आहे.