मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पक्षाच्या बैठका, राज ठाकरे राज्यात सर्वच जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार, आगामी विधानसभा निवडणुका मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी तीन दिवस पक्षातील पदाधिकाऱ्याबरोबर राज ठाकरे बैठक घेणार आहेत. यात काय चर्चा होतेय हे पाहावे लागेल.
गेले अनेक दिवस मनसे स्वबळावर लढणार की आघाडीत जाणार यावर लोकांचे लक्ष आहे. त्यातच राजू शेट्टी यांनी भेट, वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याचे संकेत यामुळे मनसे अध्यक्ष काय निर्णय घेतायत याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासाठी या बैठका महत्वाच्या आहेत.
एबीपी माझा चा व्हिडीओ :
राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निकालानंतर निकालावर हे ट्वीट केले होते :
अनाकलनीय !#Verdict2019
— Raj Thackeray (@RajThackeray) May 23, 2019
लोकसभेच्या रणशिंगात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा करत आपला उमेदवार नसताना भाजप विरुद्ध रान पेटवले होते. परंतु त्यांच्या सभेचा आघाडीला काहीच फायदा न होत भाजप विक्रमी जागांवर निवडून आले. यावर राज ठाकरे यांनी ट्विटर वर ‘अनाकलनीय’ अशी प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केले होते. आज या बैठकीनंतर राज ठाकरे काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
राज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता
आधुनिक लोकशाहीतील नागरिकांचे अधिकार, राजकारण्यांना कसे वागवावे?
अबब! मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO