काय आहे राज ठाकरे कोहिनूर बिल्डिंग प्रकरण? ईडी ने नोटीस का पाठवली आहे? वाचा

0
काय आहे राज ठाकरे कोहिनूर बिल्डिंग प्रकरण? ईडी ने नोटीस का पाठवली आहे? वाचा

राज ठाकरे कोहिनूर बिल्डिंग प्रकरण (Raj Thackeray Kohinoor Building Case) सध्या चांगलेच गाजत आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) ने  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. तपास यंत्रणेने राज ठाकरे यांना २२ ऑगस्टला अंमलबजावणी संचालनालय (ED) समोर हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.

राज ठाकरे कोहिनूर बिल्डिंग प्रकरण | Raj Thackeray Kohinoor Building Case

राज ठाकरे कोहिनूर बिल्डिंग प्रकरण | Raj Thackeray Kohinoor Building Case

कोहिनूर मिल ची जमीन उन्मेश जोशी यांची कंपनी कोहिनूर सीटीएनएल मार्फत खरेदी केल्यासंदर्भात आरोप आहेत. उन्मेश जोशी, राज ठाकरे आणि रिअल इस्टेट बिल्डर राजन शिरोडकर यांनी एकत्र येत कोहिनूर सीटीएनएल कंपनी स्थापन करत कोहिनूर मिल नंबर 3 येथील ४.८ एकर जमीन ४२१ कोटी रुपयांना २००३ मध्ये खरेदी केली होती. जागा खरेदी केल्यानंतर आधी या जागेवर मॉल होणार होता परंतु मॉल ची कल्पना रद्द करत यावर नंतर कोहिनूर स्क्वेअर नावाची बहुमजली इमारत बांधली गेली. लीझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (IL & FS) या सरकारी क्षेत्रातील कंपनीमार्फत कोहिनूर स्क्वेअर बिल्डिंग मध्ये गुंतवणूक केली गेली होती.

२००३ मध्ये आयएल अँड एफएसने (IL & FS) इक्विटीमार्फत कोहिनूर सीटीएनएल मध्ये २२५ कोटी रुपये गुंतविले होती. २००८ मध्ये आयएल अँड एफएसने (IL & FS) कंपनीने आपले शेअर्स केवळ ९० कोटी रुपयांना कंपनीलाच विकले आणि त्यामुळे त्यांचे १३५ कोटींचे नुकसान झाले. त्याच वर्षी राज ठाकरे यांनी आपले शेअर विकून कंपनीतुन बाहेर पडले. ज्यात राज ठाकरे यांना ६२ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे राजन शिरोडकर यांनी जाहीर केले होते. परंतु काही जणांनी यात कमी फायदा दाखविल्याचा आरोप सुद्धा केला होता. कोहिनूर सीटीएनएल ने आयएल अँड एफएसने (IL & FS) दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची थकबाकी केली होती. कर्ज थकबाकीमुळे कोहिनूर सीटीएनएल आणि आयएल अँड एफएस ने एक करार करत कोहिनूर बिल्डिंग मधील घरे विकून जवळपास ५०० कोटींची कर्ज वसुली केली होती. कर्जफेडी नंतर आयएल अँड एफएस (IL & FS) ने  कोहिनूर सीटीएनएल ला पुन्हा एकदा १०० कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. हे कर्ज ते परतफेड करण्यात अपयशी ठरले. Raj Thackeray Kohinoor Building Case त्यामुळेच प्रकाशझोतात आली.

IL & FS Case – Kohinoor CTNL

IL & FS ने मुंबईच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला दिलेल्या ह्या कर्जाची आणि गुंतवणूकीची ईडी चौकशी करीत आहे. ईडीच्या मते आयएल अँड एफएस (IL & FS) ने कर्ज देताना कंपनीच्या परिस्थितीची माहिती असताना नियमबाह्य कर्जवाटप केले. यापूर्वी ईडीने याप्रकरणी राज शिरोडकर यांच्यासह बर्‍याच लोकांचे जबाब नोंदवले आहेत.

ईडी ने नोटीस पाठवल्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे कडून सरकारच्या जाचाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ठाणे बंद ची हाक दिली आहे. राज ठाकरे यांनी देशभर EVM विरुद्ध उठवलेल्या आवाजामुळे सरकार रडीचा डाव खेळात असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे.

आपल्याला ईडी ने पाठवलेल्या नोटीस आणि मनसे च्या भूमिकेबद्दल काय वाटते आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत जाहीर

Raj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते

ठाकरे चित्रपटाच्या टीजर मध्ये नमाज पढत असलेला मुस्लिम व्यक्ती कोण? काय घडली होती घटना…..

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.