Raj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते

0
Raj Thackeray VS Ajit Pawar: पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात एकमेकांवर टीका, वॉटरकप 2018 विजेते

Raj Thackeray VS Ajit Pawar, पाणी फाउंडेशन, वॉटरकप २०१८, Water Cup 2018, आमिर खान, वॉटरकप 2018 विजेते

पाणी फाउंडेशन च्या वॉटरकप २०१८ स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात रंगला होता. त्यात सामान्य व्यक्तींपासून ते राजकारणी, सेलेब्रिटी सर्व उपस्थित होते.

Raj Thackeray VS Ajit Pawar

पाणी फाउंडेशन च्या वॉटरकप २०१८ स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यात राज ठाकरे यांनी बोलताना जुन्या-नव्या सरकारवर ताशेरे ओढत महाराष्ट्राच्या पाण्याच्या प्रश्नाला सरकारला दोष दिला. गेल्या ६० वर्षात सरकार पाणी प्रश्न का सोडवू शकले नाही? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत नक्की पाणी कुठे मुरतेय असा टोला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला. सरकारी अधिकारी पाणी फाउंडेशन मध्ये काम करत आहेत पण सरकारच्या शिवार योजनेत का नाही याचा विचार केला पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी अभिनेता आमिर खान चे पाणी फाऊंडेशन च्या कामाबद्दल कौतुक केले आणि त्यांना भावी कामासाठी शुभेच्छा देत त्यांचे आभार सुद्धा केले.

अजित पवार यांचे उत्तर

राज ठाकरे यांनी गेल्या ६० वर्षात सिंचनाचा पैसे गेला कुठे? या विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार उत्तर देताना म्हणाले की काहीजण नुसते बोलघेवडे असतात, त्यांना काही करायचे नसते. त्यांना फक्त सभा जिंकायच्या असतात असे प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

गावातील राजकारणी कुरघोड्यांमुळे दुष्काळ हटाव साज काम यशस्वी झाले नसल्याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. “पाणी अडवा आणि पाणी जिरवा” हे सोडून गावागावात “एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा” हे चालु झाल्याने गावांचा विकास रोडावला होता असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी वॉटरकप विजेत्या गावांना सरकारतर्फे पहिल्या क्रमांकासाठी 25 लाख, दुसऱ्याला 15 लाख, तिसऱ्याला 10 लाख अनुक्रमे बक्षीस जाहीर केले.

वॉटरकप 2018 विजेते

तृतीय क्रमांक
आनंदवाडी, बीड
उमठा, नागपूर

दुसरा क्रमांक
मांडवली, सातारा
सिंदखेड, बुलढाणा

पहिला क्रमांक
टाकेवाडी (आंधळी), सातारा

paani foundation: watercup 2018 winner

पहिला क्रमांक पटकवणाऱ्या टाकेवाडी गावाला पाणी फाउंडेशन तर्फे 75 लाखांचे बक्षीस मिळाले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

टाटा समूह माहिती: देशाच्या प्रगतीचा वसा घेतलेले ध्येयवेडे टाटा !

Top 10 Digital Marketing Courses in Pune with 100% Placement Assistance

सरकार सोशल मीडियावर निर्बंध आणण्याच्या तयारीत, आपत्कालीन स्थितीत राहणार बंद?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.