Trending News: Rajnikanth Announced Entry in Tamilnadu Politics
दक्षिण भारतीय सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी आज आपल्या चाहत्यांच्या समोर राजकारणात येण्याची घोषणा केली.

रजनीकांत म्हणाले की, ते तामिळनाडूत होणारी पुढील विधानसभा निवडणुक लढणार आहेत. त्यांनी आपल्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा देखील केली.
रजनीकांत म्हणाले की ते भ्याडपणा ण दाखवता शब्दाला जागणार असून आपली कर्तव्ये पूर्ण करीत पुढे वाटचाल करेन.
आपल्या लहान भाषणात, रजनीकांत म्हणाले की तामिळनाडूमधील लोकशाही एका वाईट युगातून जात आहे आणि म्हणूनच ही प्रणाली बदलणे आवश्यक आहे. रजनीकांत यांनी भ्रष्टाचारविरोधी लढा देणार असल्याचे सुद्धा बोलले.

राघवेंद्र कल्याण मंडपम मध्ये बोलताना रजनीकांत म्हणाले की, “मी ह्या संकटाच्या वेळी राजकारणात आलो नाही तर ती माझ्यासाठी लाजिरवाणी बाब ठरेल”
रजनीकांत यांनी लोकांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले. तमिळनाडूतील प्रत्येक गावात आणि रस्त्यावर जाऊन लोकांचा विश्वास जिंकणार असल्याचे सुद्धा ते बोलले.

67 वर्षीय रजनीकांत म्हणाले, “राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीसाठी एक नवीन राजकीय पक्ष तयार करण्याचा हेतू आहे. आम्ही २०२१ मध्ये तामिळनाडूमधील सर्व २३४ जागांसाठी निवडणूक लढवणार आहोत.
@PuneriSpeaks
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.