रजनीकांत, Rajinikanth Marathi, Rajnikanth Family, Rajinikanth Daughters, Shivaji Rao Gaikwad, Rajinikanth Life Story, Shivaji Gaikwad, दाक्षिणात्य चित्रपटात घुमलेलं मराठमोळं वादळ
आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप आणि जबरदस्त संवादफेकीच्या जोरावर चित्रपटगृह आणि चित्रपटगृहाच्या बाहेरही तुफान गर्दी खेचुण आणणारा ‘सुपरस्टार रजनीकांत’ याच्याबद्दल काही ठराविक गोष्टी ज्या आपल्याला कदाचित माहित नसतील…..
१) सुपरस्टार रजनी नावाने सर्वत्र प्रसिध्द असलेला रजनीकांतचे खरे नाव शिवाजी गायकवाड आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूरू येथे एका मराठा हेंद्रे पाटील कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव ‘रामोजी गायकवाड‘ तर आईचे नाव ‘जिजाबाई गायकवाड‘ होते. साध्या मराठमोळ्या घरात रजनीकांतचा जन्म झाला असून एवढ्या प्रसिद्धीच्या झोतात तो स्वतःच्या कष्टावर गेला आहे.
२) रजनीकांतचे चाहते हे त्याच्यासारखेच स्टायलिश आहेत त्यामुळे त्याचा जन्मदिवस १२ डिसेंबर जागतिक स्टाईल दिन म्हणुन सर्वत्र साजरा करतात.
३) रजनीकांतचे पुर्वज ‘पुणे’ जिल्ह्यातील खेड या तालुक्यातील कोयाळी येथील असून जेजुरी निवासी खंडेराया हे रजनीकांतचे कुलदैवत आहे.

४) रजनीकांतला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी नितांत आदर असून त्याने महाराजांचे भले मोठे पेंटिंग त्याच्या घरातच लावलेले दिसते.
५) जगातील सर्वाधिक चाहता वर्ग असणारा अभिनेता म्हणुन गिनीज बुकात त्याची नोंद केलेली आहे. दक्षिण भारतातील यशस्वी चित्रपटामध्ये रजनीकांत चे चित्रपट पहिला क्रमांक काढतात, सर्वाधिक कमाई (रोबोट) हा चित्रपट सुद्धा त्याच्याच नावावर आहे.
६) आशिया खंडातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत रजनीकांत दुसर्या क्रमांकावर आहे, त्याने ‘शिवाजी द बॉस‘ साठी २८ कोटी घेतले होते. आशियामध्ये सर्वाधिक मान घेणारा चीनी अभिनेता जेकी चेन आहे.
७) रजनीकांतने ट्वीटर अकाऊंट उघडल्या-उघडल्या लगेच २४ तासातच तब्बल २१ लाखांच्यावर लोकांनी त्याला फॉलोव केले. सध्या रजनीकांतचे जवळपास ४४ लाखांहुन अधिक फॉलोवर्स झालेले आहेत.
Follow @superstarrajini
८) रजनीकांतने तरुणपणीच्या सुरुवातीच्या काळात खुप हाल सोसुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. त्याने मद्रासमध्ये काही दिवस सुतारकाम करून उदरनिर्वाह करत असे. बंगळुरुमध्येही बोजा उचलण्याचे काम करत करत तो ७५०रु. महिना अशा पगारावर बस कंडक्टर या पदावर रुजू झाला.
९) बसमध्ये बोटांवरुन चिल्लर हाताळण्याच्या करामती, प्रवाशांना ऍक्शनमध्ये तिकीट देणे, गाडी थांबवण्यासाठी वेगळ्या प्रकारची शिट्टी वाजवण्याची त्याची शैली, सिगरेट पेटवण्याची वेगळी स्टाईल यामुळे रजनीकांत सर्व बस मध्ये प्रसिध्द होत गेला.
Rajnikanth Family
१०) रजनीकांतचे वडील रामोजी गायकवाड हे एक पोलीस कॉन्स्टेबल होते तर त्यांची आई जिजाबाई या गृहिणी होत्या. रजनीकांत पाच वर्षांचा असताना त्याची आई देवाघरी गेली. नंतर वडील आणि भाऊ बहिण असे त्यांचे घर राहिले.

११) रजनीकांतने कन्नड, तेलगु, तमिळ, मल्याळम, बंगाली, हिंदी, इंग्रजी अशा बहुभाषिक चित्रपटात काम केले असून मराठी असलेल्या रजनीकांतने मराठी चित्रपटात काम केलेले नाही हे विशेषच,
Rajinikanth Daughter’s
१२) रजनीकांतच्या सौभाग्यवतीचे नाव ‘लता गायकवाड’ असुन त्याला सौंदर्या व ऐश्वर्या अशा दोन मुली आहेत. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य अभिनेता धनुष याची सहपत्नी असून ती एक नावाजलेली दिग्दर्शिका आहे. ‘३’ नावाच्या गाजलेल्या चित्रपटाचे तिने दिग्दर्शन केले होते.

Rajinikanth Education
१३) रजनीकांतचे उच्चशिक्षण रामकृष्ण मिशन कॉलेज बंगळुर झाले आहे तर प्राथमिक शिक्षण आचार्य पाठशाळा बंगळुर येथे झालेले आहे. त्याने मद्रास फिल्म इन्स्टिट्युट मध्ये अभिनयाचा डिप्लोमा कोर्स सुद्धा केलेला आहे.
१४) रजनीकांतला रजनी, थलैवा, सुपरस्टार, बॉस विविध नावांनी ओळखले जाते, त्याचा चाहतावर्ग त्याला ‘थल्लैवा‘ या नावाने जास्त ओळखतात.
१५) चेन्नईमध्ये रजनीकांतचा स्वतःचा राघवेंद्र मंडपम हा प्रसिद्ध मॅरेज हॉल आहे.
१६) रजनीकांतचा आपला २००२ मधील पडलेला ‘बाबा’ आणि २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कुसेलन’ हे चित्रपट बॉक्सऑफिसवर अपयशी झाल्यानंतर त्याने स्वतः सर्व डिस्ट्रिब्युटर्ची नुकसान भरपाई भरून दिली होती.
१७) रजनीकांतकडे खुप नियमितता असुन भल्या पहाटे पाचला उठुन योगा करण्याची त्याला आवड आहे. शुटिंगच्या वेळी तो वेळेवर हजर असतो. नियमाप्रमाणे रात्री ९ नंतर तो कुणालाही भेट देत नाही.
Rajinikanth Awards
१८) भारत सरकारने रजनीकांतला २००० मध्ये पद्मभुषण आणि २०१६ मध्ये पद्मविभुषण अशा विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. त्याचबरोबर जर्मनी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार सुद्धा त्याला मिळाला आहे, जपानमधील एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझीन मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीत रजनीकांत चे नाव असून असे विविध सन्मान त्याला मिळालेले आहेत आणि पुढेही मिळतील.
१९) रजनीकांत १९९५ पासुन त्याचा प्रत्येक चित्रपट झाला की काही दिवस शांतता मिळवण्यासाठी हिमालयात जातो.
२०) १९७५ मध्ये तमिळ अपुर्वा रागणगल या पहिल्या चित्रपटातील खलनायकाच्या छोट्याशा भुमिकेपासुन त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. १९८८ मध्ये ‘Bloodstone’ या इंग्रजी चित्रपटात त्याने काम केले होते. ‘अंधा कानुन’ हा त्याचा पहिला-वहिला हिंदी चित्रपट होता. त्याने आज पर्यंत पावणेदोनशेच्या वर चित्रपटात काम केले असून २०० चा टप्पा तो लवकरच गाठेल अशी प्रार्थना त्याचे सर्व चाहते करत आहेत.
२१) रजनीकांतचा रोबोट २ हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या भारतातील पहिला मेक इन इंडिया चित्रपट ठरला आहे.
२२) धोतर कुर्ता हा पारंपारिक पोशाख त्याचा आवडता आहे. दाक्षिणात्य ‘मसाला डोसा’ हा त्याचा आवडता खाद्यपदार्थ.
२३) योगाचार्य सच्चिदानंद स्वामी यांच्यावर त्याची निकट श्रद्धा असून त्याची अर्धी कमाई सार्वजनिक आणि धार्मिक कार्यात तो खर्च करत असतो.
२४) रजनीकांत आज जगातील कोणतीही वस्तु विकत घेण्यास सक्षम असला तरी अजुनही साधी राहणीमान पसंद करतो. जसे की त्याचे कपडे, त्याची जुनी गाडी सर्व साध्या राहणीमानाप्रमाणे आहेत.
२५) रजनीकांतला काहीच अशक्य असे नाही म्हणुनच कदाचित आज वयाच्या ६७व्या वर्षीही त्याच्याइतकी कमाई करणारा दुसरा कोणी सुपरस्टार जगात सापडणार नाही.
कंडक्टर शिवाजी गायकवाड ते सुपरस्टार रजनी असा अद्भुत प्रवास करणाऱ्या आपल्या मर्द मराठा शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत, थलैवा, सुपरस्टार, बॉस याला @PuneriSpeaks चा सलाम….!!
आपल्याला ही माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका….
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
Trending News: Rajnikanth Announced Entry in Tamilnadu Politics | Marathi
Narendra Modi Net Worth The 14th Prime Minister of India: Wiki, Biography