राम कदम वाद: राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, जिवंत सोनाली बेंद्रे ला वाहिली श्रद्धांजली

0
राम कदम वाद: राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, जिवंत सोनाली बेंद्रे ला वाहिली श्रद्धांजली

राम कदम वाद: राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, जिवंत सोनाली बेंद्रे ला वाहिली श्रद्धांजली

राम कदम वाद यांचे नाते चांगलेच जुळलेले दिसत आहे. वादग्रस्त विधानावरून भोवऱ्यात अडकलेले भाजप आमदार राम कदम यांच्या संकटांमध्ये आता नव्याने भर पडली आहे. मुक्ताफळं उधळणाऱ्या राम कदम हे आता त्यांच्या ट्विटमुळे अडचणीत आले आहेत. बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या निधनाची अफवा सर्वत्र पसरली असताना शहानिशा न करता राम कदम यांनी अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाचं ट्विट त्यांनी केलं. या ट्विट मुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीका झाली आहे.

राम कदम यांचे ट्विट

राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, जिवंत सोनाली बेंद्रे ला वाहिली श्रद्धांजली

‘हिंदी व मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड’, असं ट्विट त्यांनी केले होते. सर्वांना यावर धक्का बसला होता परंतु हि एक अफवा असल्याचे लोकांना समजले.

हि बातमी चुकीची असल्याचं लक्षात येताच राम कदम यांनी हे ट्विट डिलीट केले, परंतु लोकांनी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मात्र त्यांच्यावर सडकून टीका केली. मुख्य म्हणजे आपली ही चूक सावरुन नेण्यासाठी राम कदम यांनी आणखी एक ट्विट केले. गेल्या दोन दिवसांपासून सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीविषयीच्या अफवा पाहायला मिळत आहेत, मी त्यांच्या हितासाठी आणि उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतो, असं लिहित त्यांनी आपल्या चुकीवर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

मुलींना पळवून आणण्याच्या विधान अजूनही शांत झालेले नसताना त्यांच्या या ट्विट ने त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका झाली आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

राम कदम आक्षेपार्ह विधान: ABP माझा च्या ज्ञानदा कदम यांनी राम कदम यांची केली खरडपट्टी

वाहतुकीचे नियम तोडताय, मग आपल्याला पासपोर्ट मिळणार नाही, पुणे पोलिसांची नवीन मोहीम

नोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.