राम मंदिर बांधकामावेळी शिवलिंग, पुरातन देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या, फोटो

0
राम मंदिर बांधकामावेळी शिवलिंग, पुरातन देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या, फोटो

राम मंदिर वाद अखेर सर्वोच्च न्यायालयाने मिटवला आणि राम मंदिराच्या उभारणीला हिरवा कंदील मिळाला. राम मंदिर उभारणी सुरू झाली आहे. गेली दहा दिवस अयोध्या येथील राम मंदिर जागेत खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम सुरू असताना जुन्या मूर्ती आणि खांब अशा ऐतिहासिक वास्तू सापडत आहेत. यामध्ये देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब असे अनेक वस्तुंचे अवशेष सापडले आहेत.

कोरोना संकटामुळे सर्व कामे ठप्प होती. आता सरकारने बांधकामांना मूभा दिल्यानंतर मागील दहा दिवसांपासून अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे.

“मागील दहा दिवसांपासून मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तुंचे अवशेष सापडले. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे”

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय

९ नोव्हेबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर वादग्रस्त जागेचा विषय मिटला असून राम मंदिर काम सुरू आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.