रायबरेली, उत्तरप्रदेश: बलात्कारपीडित तरुणीने न्याय मिळावा यासाठी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. त्यात तिने न्यायाची अपेक्षा करत आरोपींना कडक शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.
आरोपींचे उच्चपदस्थांशी लागेबांधे असल्याने पोलीस कारवाईस विलंब करीत असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला. आरोपी खटला मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणत आहेत. आपल्याला न्याय द्यावा अन्यथा आपण आत्महत्या करू, असे पीडितेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, २४ मार्चला दिव्या पांडे आणि अंकित वर्मा यांच्याविरुद्ध बाराबंकी ठाण्यात बलात्काराच्या आरोपाबाबत एफआयआर दाखल करून घेतली आहे.
पीडितेच्या वडिलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीवर आरोपींनी बलात्कार केला आणि तेव्हापासून ते तिला ब्लॅकमेल करीत असल्याचे म्हणले आहे.
आता यात नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ काय पाऊले उचलतात हे पहावे लागेल.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
For More:
तुझ्यात जीव रंगला फेम राणादा कडे आहे ही महागडी कार