वादावर पडदा टाकत रवी जाधव पुढच्या चित्रपटाच्या तयारीसाठी रुजू…

0
वादावर पडदा टाकत रवी जाधव पुढच्या चित्रपटाच्या तयारीसाठी रुजू…

रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ चित्रपटाला गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून गाळल्यानंतर मराठी चित्रपट क्षेत्रात बराच वादंग उठला होता.


आता यातून बाहेर पडत रवी जाधव नवीन चित्रपटाच्या तयारीसाठी काही दिवस विश्रांती घेत आहे. तसे त्यांनी सोशल मीडियावर जाहीरही करून टाकले.

या चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या २० चित्रपटपैकी ९ चित्रपट मराठी आहेत. रवी जाधव चा अभिनय असलेला ‘कच्चा लिंबु’ हा चित्रपट सुद्धा निवडला गेला असून वादावर पडदा टाकण्यातच रवी जाधव यांनी सुख मानल्याने कळते.

‘न्यूड’ चित्रपटाच्या चित्रपट महोत्सवातून वगळल्यानंतर त्याला साथ देणारे आणि विरोध करणारे खुप तयार झाले. काहींनी चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्याने प्रवेश नाकारला असे म्हणले तर काहींनी चित्रपट अजून एडिटिंग मध्ये असल्याने प्रवेश मिळू शकला नाही असे म्हणले. पण यातून मार्ग काढत या वादावर पडदा टाकत रवी जाधव पुढच्या चित्रपटाची तयारी करण्यात मग्न झाले आहेत.
Like Share Follow @PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.